• Tue. Sep 22nd, 2026

दीड वर्षांपूर्वी लग्न, ७ महिन्याची लेक, पण पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय; पतीचं निर्घृण कृत्य

दीड वर्षांपूर्वी लग्न, ७ महिन्याची लेक, पण पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय; पतीचं निर्घृण कृत्य

म. टा. प्रतिनिधी, येरवडा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी रात्री लोहगावात घडली. विमानतळ पोलिसांनी काही वेळातच आरोपी पतीला ताब्यात घेऊन अटक केली.

रुपाली ऊर्फ बबिता आशिष भोसले (वय ३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी स्वप्नील बाळासाहेब खांदवे (वय ३०, रा. लोहगाव) याने फिर्याद दिली आहे.

ठाण्यात मोठी दुर्घटना: ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली, ६ कामगारांचा मृत्यू

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आणि रुपाली यांचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सात महिन्यांची मुलगी आहे. मागील काही दिवसांपासून पत्नी रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती आशिष भोसले घेत होता. त्यातून तो पत्नीशी सतत भांडणे करत होता. शनिवारी रात्री पुन्हा आशिषने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीशी जोरदार भांडणे करून शिवीगाळ केली. या दरम्यान आशिषने धारदार चाकूने रुपालीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून जखमी केले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी काही वेळातच आरोपीला लोहगाव परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो आणि त्याची पत्नी धुणे-भांडी करून कुटुंब चालवीत होते. त्यांना सात महिन्यांची मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed