• Mon. Nov 11th, 2024

    मुंबईकडे जाणारी क्रेन पुण्याच्या लेनमध्ये, बोरघाटात वाहतूक कोंडीनं प्रवासी त्रस्त

    मुंबईकडे जाणारी क्रेन पुण्याच्या लेनमध्ये, बोरघाटात वाहतूक कोंडीनं प्रवासी त्रस्त

    पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रेनचा किरकोळ अपघात झाला होता. खंडाळा घाटाच्या जवळ हा अपघात झाला आहे. अपघात किरकोळ स्वरुपाचा असला तरी एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या असल्याने मुंबई आणि पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहनांची गर्दी झाली आहे. पुण्याकडून मुंबईकडे निघालेली क्रेन चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून पुण्याच्या लेन मध्ये घुसली. त्यामुळे सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

    पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघाताच्या घटना घडत असतात. अनेकांनी यात आपले जीव देखील गमावलेले आहेत. पुण्याकडून मुंबईकडे जाताना खंडाळा बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघात जरी छोटा असला तरी यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याचा अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीने एक ते दोन किमी च्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
    Maratha Protest : अंतरवाली सराटी आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरण हायकोर्टात, कुणी केली फौजदारी जनहित याचिका?
    पुणे -मुंबई एक्स्प्रेस वेवर प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात असल्या तरी किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. आज सायंकाळी झालेला अपघात हा क्रेन चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक कोंडीचा मात्र सामना करावा लागला.
    “लवकरच मोठी घोषणा…”, शिंदे गटातील माजी आमदार काय निर्णय घेणार?, फ्लेक्समुळं पुण्यात तर्क वितर्क सुरु
    क्रेन पुण्याकडील मार्गिकेत आल्यानं धीम्या गतीने वाहतूक सुरू असून लवकर ही वाहतूक सुरुळीत होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.
    Morocco Earthquake : मोरक्कोत भूकंपानं हाहाकर, १०३७ जणांचा मृत्यू, जागतिक वारसा स्थळाचंही नुकसान

    महाराष्ट्रातल्या सह्याद्रीप्रमाणेच ते दिल्लीतले बादशाह, मोदी पुण्यातून लोकसभा लढणार? पुणेकरांच्या प्रतिक्रिया

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed