• Sun. Nov 17th, 2024
    भालाफेकीचा सराव करताना लेस बांधायला खाली झुकला, तेवढ्यात अनर्थ…; कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न

    रायगड: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये विविध स्पर्धा परीक्षा आणि अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. खेळात अग्रेसर असणारे विद्यार्थी या स्पर्धांसाठी जीवतोड मेहेनत करत असतात. मात्र खेळाचा सराव एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना माणगाव तालुक्यातून समोर आली आहे.
    मित्र पोहण्यासाठी गेले; अचानक मोठा भाऊ बुडताना दिसला, वाचवण्यासाठी तरुणाने मारली उडी अन्…
    मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील गोरेगाव-वणी येथील INT अकॅडमी इंग्लिश स्कूल अँड हायस्कुलमध्ये हुजैफा कुतुबुद्दीन डावरे हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच त्याने भालाफेक क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवले होते. शाळेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा सराव सर्व खेळाडू करत होते. त्याच स्पर्धेत भालाफेक स्पर्धेचा सराव हुजैफा करत होता. त्याने भाला फेकला. तो फेकलेला भाला दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थ्याने उचलला. त्या विद्यार्थ्याने पुन्हा भाला हुजैफाच्या दिशेने फेकला. अनावधानाने हुजैफा त्याचवेळी आपल्या शूजची लेस बांधण्यासाठी खाली वाकला. त्यामुळे त्याचे वेगाने येणाऱ्या भाल्याकडे लक्ष नव्हते.

    मराठा आंदोलनाचा एसटी विभागाला फटका, तीन दिवसांत कोटयवधीचं नुकसान

    समोरील विद्यार्थ्याने फेकलेला भाला थेट येऊन हुजैफाच्या डोक्यात बसला. अचानक झालेल्या या घटनेने सारेच भांबावले. जबर जखमी झालेला हुजैफा तोपर्यंत जागीच गतप्राण झाला होता. या दुःखद घटनेने शाळेत शोककळा पसरली आहे. तर डावरे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अधिक तपास माणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed