• Mon. Nov 25th, 2024

    चार दिवसांपासून दुकान बंद, घराचं दारही बंद, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं, दार उघडून पाहताच

    चार दिवसांपासून दुकान बंद, घराचं दारही बंद, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं, दार उघडून पाहताच

    सातारा : येथील शुक्रवार पेठेतील एका वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. ६ रोजी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय ८६), प्रभावती उत्तमराव शिंदे (वय ७५) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

    याबाबत पोलिसांनी सांगितले की, उत्तमराव शिंदे यांचे पोवईनाक्यावर छोटसं दुकान आहे. या दुकानात ते नेहमी जायचे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते दुकानात गेले नाहीत. दरम्यान, बुधवारी दुपारी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे तातडीने कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले.

    ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला पण माघारीच आला नाही, अल्पवयीन मुलाचं अपहरण करून खून, पुण्यातला धक्कादायक प्रकार
    खिडकीतून हात घालून पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यावेळी उत्तमराव शिंदे आणि प्रभावती शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या मृतदेहाशेजारीच विषारी औषधांची बाटली पोलिसांना सापडली. चार दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघेच घरात राहात होते. प्रभावती यांना वयोमानामुळे स्वयंपाक करता येत नसल्यामुळे बाहेरहून ते रोज जेवणाचा डबा आणत होते. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पुढे आले नाही. वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.

    सोलापुरात मराठा आंदोलकांचा गनिमी कावा; अचानक रसत्यावर उतरले आणि…; पोलिसांची मोठी तारांबळ

    आत्महत्येचं कारण अस्पष्ट

    उत्तमराव शिंदे आणि प्रभावती शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळं टोकाचा निर्णय घेतला हे समोर आलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून तपासाअंती या प्रकरणातील सत्य समोर येईल. मात्र, ही घटना समोर येताच साताऱ्यातील शुक्रवार पेठेत खळबळ उडाली आहे.
    बापाची तब्येत बिघडली पण लेकीने हुंकार भरला, पप्पा आता आरक्षण घेऊनच घरी परतायचं, त्याशिवाय माघार नको!

    मला खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न, कोणी बाल बाका करू शकत नाही ; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed