• Sat. Sep 21st, 2024

चिंता वाढली… मुंबईत झिकाचा दुसरा रुग्ण आढळला, १५ वर्षांच्या मुलीला लागण, जाणून घ्या लक्षणं

चिंता वाढली… मुंबईत झिकाचा दुसरा रुग्ण आढळला, १५ वर्षांच्या मुलीला लागण, जाणून घ्या लक्षणं

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील कुर्ला येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून, तिला इतर दीर्घकालीन आजार आहेत. १९ जुलैला चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता.

या झिकाबाधित मुलीला २० ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला तिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, ५ सप्टेंबरला तिला सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला झिका झाल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने ती राहत असलेल्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये कोणताही नवीन संशयित रुग्ण किंवा तापाचा रुग्ण आढळला नाही. मात्र या परिसरात एडीज डासोत्पत्ती आढळली. तेथे डासनियंत्रण उपाययोजना राबविण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

हा झिका विषाणूमुळे होणारा सौम्य आजार आहे. तो संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. हा आजार विषाणूजन्य असला तरी करोनासारखा वेगाने पसरत नाही. झिका विषाणूची लागण झालेल्यांपैकी ८० टक्के व्यक्तींना लक्षणे नसतात. ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. या आजाराच्या चाचणीची सुविधा ‘केईएम’मध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed