• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यात महावितरणमधील अधिकाऱ्याचा भरदिवसा खून; घटनेला अनैतिक संबंधांची किनार, काय घडलं?

    पुण्यात महावितरणमधील अधिकाऱ्याचा भरदिवसा खून; घटनेला अनैतिक संबंधांची किनार, काय घडलं?

    पुणेः अनैतिक संबंधाचा वादातून महावितरणमधील एका वरिष्ठ तंत्रज्ञाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात ही घटना सोमवारी दुपारी मनोहर गार्डनजवळ खंडोबा मंदीर रोड परिसरात घडली आहे. गोपाळ कैलास मंडळे (वय ३२, रा. ओवी अंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा) असं खून झालेल्या तरुणचे नाव आहे.

    या हत्येप्रकरणी पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा खून अनैतिक संबंधाचा संशय आणि याआधी झालेल्या वादातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    बँक अकाऊंट रिकामं होण्यापूर्वीच डिलीट करा ‘हे’ दोन फेक अँड्रॉइड अ‍ॅप्स; चिनी ग्रुपची करामत

    नेमकं काय घडलं?

    महावितरणमध्ये गोपाळ मंडळे हेवरिष्ठ वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होते. त्यांची महावितरणच्या सिंहगड रोड विभागात नेमणूक होती. मागील चार वर्षांपासून मंडळे हे रायकर मळा येथे पत्नी, मुलगा, आई यांच्यासोबत वास्तव्यास होते. मांडवकर याचे नात्यातल्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मंडळे यांना होता. त्यातून दोघांचा वाद झाला होता. तो वाद मिटवण्यासाठी दोघे एकत्र खंडोबा मंदिर रोड परसिरात आले असताना, परत त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी मांडवकर याने चाकूने मंडळे यांच्या गळ्यावर वार केले.

    गंभीर जखमी झाल्याने मंडळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मांडवकर फरार झाला होता. ही घटना भरदिवसा रस्त्यावर घडली. तेथून जाणार्‍या एका व्यक्तीने पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, जयंत राजुरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मंडळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मंडळे यांचा खून केल्यानंतर मांडवकर हा तेथून फरार झाला होता.

    दरम्यान, स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके देखील त्याचा शोध घेत होती. त्यावेळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांना मांडवकर हा धायरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मांडवकर याने खुनाची कबुली दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *