जळगावातील खेडी येथील आयोजित मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितलं नव्हतं तर शरद पवार साहेबांकडे बघितलं होतं, असे म्हणत चिन्ह असलं काय आणि नसलं काय शरद पवार साहेब आमच्यासोबत आहेत, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना सुनावलं आहे.
आम्ही म्हणत होतो, भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आहे. दोन महिने होताच यांच्यामध्ये अहंकार यायला लागला आहे. भाजपचे नेते यांना सांगतात.. निवडणूक आयोग आपलंच ऐकत.. मगच हा अहंकार प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये आलेला दिसतोय. निवडणूक आयोगाच्या आधीच हे निर्णय देता येते यावरूनच समजून घ्या की निवडणूक आयोग भाजपाचे कदाचित ऐकतंय असा आरोपही आमदार रोहित पवारांनी केला आहे.
चिन्ह आम्हालाच मिळेल त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे.. निकाल आमच्याच बाजूने लागेल असं वक्तव्य अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. याच विषयावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना जोरदार उत्तर दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावमध्ये सभा होणार आहे. त्या सभेच्या तयारीसाठी रोहित पवार जळगावसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. जळगावमधील सभा यशस्वी ठरावी म्हणून रोहित पवार प्रयत्न करत आहेत.