• Sun. Sep 20th, 2026
एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी चेतनसिंहचा खटला जलदगतीने? आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरु

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ कर्मचारी आरोपी चेतनसिंह याच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तपास अंतिम टप्यात असून, येत्या काही आठवड्यांत चेतनसिंहविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चेतनसिंहने केलेल्या गोळीबारात आरपीएफ सहाय्यक निरीक्षक टीकाराम मीना, अब्दुल भानपुरवाला, अख्तर अब्बास अली आणि सय्यद सैफुद्दीन यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ३१ जुलैला घडली असून, याला एक महिना उलटून गेला आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी साधारणपणे ९० दिवसांचा वेळ असतो. मात्र, रेल्वे पोलिसांनी दीड महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वे प्रवासी, रेल्वे डब्यातील कर्मचाऱ्यांसह १६४ नागरिकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरोपी चेतनसिंहचा मोबाईलमधील कॉल रेकॉर्डचा सविस्तर तपशील उपलब्ध झाला आहे. स्थानक आणि रेल्वे डब्यातील व्हिडिओ फुटेज मिळवण्यात आले आहे. यानुसार आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरू असून, ४५ दिवसांत आरोपत्र दाखल करून हा खटला जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहेत, असे वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘आत्महत्या करू की, पोलिसांना शरण जाऊ’

पहिल्या नागरिकांवर गोळीबार केल्यानंतर चौथ्या नागरिकांवर गोळीबार करेपर्यंत आरोपी चेतनसिंहकडे सुमारे ४५ मिनिटांचा वेळ होता. गोळीबारानंतर आरोपीने पत्नीला मोबाइलवरून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ‘माझ्याकडे बंदूक आहे. आत्महत्या करू की, पोलिसांना शरण जाऊ,’ असा प्रश्नही सिंहने पत्नीला विचारला होता. त्या वेळी पोलिसांना शरण जा, असे पत्नीने चेतनला सांगितले.

जळगावात अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; खून करून मृतदेह गुरांच्या गोठ्यातील चाऱ्यात लपवला


निष्कर्ष गुलदस्तात

एक्स्प्रेस गोळीबार घटनेनंतर रेल्वे मंडळाने उच्चस्तरीय पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. तीन आठवड्यात समितीने अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द केला आहे. मात्र, त्या अहवालात नेमके काय याचा उलगडा अद्याप झालेला नाही. गोळीबार घटनेला एक महिना उलटला आहे. सद्यस्थितीत रेल्वे सुरक्षा दलात धोरणात्मक कोणतेही बदल झालेले नाही, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजते.

मुंबईत फ्लॅटमध्ये सापडली एअर होस्टेसची बॉडी; ‘त्या’ भांडणामुळे जीव गेला? खळबळजनक माहिती उघड

सेवा संकल्प अभियानांतर्गत ४१ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे; पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
नागरिकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed