• Mon. Nov 25th, 2024

    ‘बाबा, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’; आईच्या कृत्याने घाबरलेला मुलगा धावत सुटला आणि…

    ‘बाबा, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’; आईच्या कृत्याने घाबरलेला मुलगा धावत सुटला आणि…

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘बाबा, बाबा… आजीचा मर्डर झाला, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’, अशी आरडाओरड करीत मुलाने वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वृद्धेच्या हत्याकांडाची घटना उघडकीस आली.

    सासूचा खून केल्याप्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी मारेकरी सुनेला अटक केली. अटकेतील या सुनेला पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. पूनम आनंद शिखरवार (वय ३८) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या सुनेचे तर तारादेवी ब्रिजराज शिखरवार (वय ८०, रा. गुडधे लेआउट, भामटी मार्ग), असे मृत सासूचे नाव आहे.

    Devendra Fadanavis: फडणवीसांच्या संकटमोचकांना अपयश; उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या महाजनांना जरांगे पाटलांचे २ पर्याय

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम ही मनोरुग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी आनंद हे घराजवळीलच गॅरेजमध्ये गेले. त्यांची मुलगी शिकवणी वर्गाला तर मुलगा दिव्यांश हा बाहेर खेळायला गेला. यावेळी तारादेवी पलंगावर झोपल्या होत्या. चाकूने गळ्यावर वार करून पूनमने तारादेवी यांची हत्या केली. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दिव्यांश हा खेळून घरात आला. पलंगावर त्याला ताराबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. पूनम पलंगावरच बसली होती. ते दृश्य पाहून दिव्यांश घाबरला. जोररजोरात आरडाओरड करीत तो थेट गॅरेजमध्ये गेला. घाबरत घाबरत वडिलाला आपण पाहिलेल्या प्रसंगाची माहिती दिली. आनंदही हादरले. ते तातडीने घरी आले. त्यानंतर एका शेजाऱ्याने प्रतापनगर पोलिसांना कळविले.

    दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल पूनमला अटक केली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *