• Mon. Nov 25th, 2024
    आधी जेवणावरून वाद; नंतर भंडाऱ्याचा एकत्र आस्वाद, रात्री पुन्हा वाजलं, अन् सगळं संपलं

    इंदापूर: जेवण बनवण्याच्या कारणावरून कोयत्याने वार करत एका शेतमजुराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे घडली आहे. शुभम लालजी भारतीय (३५, लेडडी ता. मेजाखास, जिल्हा अलाहाबाद उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश मारूती जांभळकर (३२, रा. राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरून नीरजकुमार लालमणी कुशवाह या आरोपीस अटक केलेली आहे.
    तरुण जीवन संपवण्याच्या तयारीत; पोलिसांना मेल आला, तपास सुरू, नंतर वेगळचं सत्य समोर, काय घडलं?
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथील मिलिंद जीवनधर दोशी यांची बारा एकर जमीन फिर्यादी जांभळकर यांनी वाट्याने करायला घेतली आहे. या शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय हे उत्तर प्रदेश मधील कामगार या ठिकाणी काम करत आहेत. शनिवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी नीरजकुमार आणि शुभम यांच्यात जेवण बनवण्यावरून वाद झाला होता. हा वाद जांभळकर यांनी मिटवला होता.

    मराठा युवकांचा संताप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आक्रमक घोषणाबाजी

    त्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचा त्यांनी आस्वाद घेतला. मात्र रात्री उशीरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅपवर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला. जांभळकर यांनी तात्काळ वरती जाऊन पाहिले असता नीरजकुमार कुशवाह हा कोयत्याने शुभम भारतीय याच्यावरती वार करत होता. यानंतर जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने जखमी झालेल्या शुभम भारतीय याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकीय तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *