• Mon. Nov 25th, 2024
    जालन्यातील घटनेची धग बारामतीपर्यंत, तर पळता भुई थोडी होईल, अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

    दीपक पडकर, पुणे : जालना येथे आरक्षण मागणीसाठी सनदशीर मार्गाने उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा बारामतीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी लाठी हल्ल्याचा आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लाठी हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज,अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू राष्ट्र सेना,शिवजयंती महोत्सव समिती, मराठा सेवा संघ व इतर संघटना यांच्या वतीने नायब तहसीलदार भाऊसाहेब करे व शहर पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिला,पुरुष,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सदर भ्याड हल्ल्याची या सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने मराठा समाजाला गृहीत धरू नये, यापूर्वी झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात टाचणी पडली तरी आवाज येईल असं असताना काल उपोषण कर्त्यांवर झालेला हल्ला या मागील गौड बंगाल काय आहे..याचा सखोल तपास करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून करण्यात आली. मराठा समाज रस्त्यावर उतरला तर प्रशासनाला पळता भुई थोडी होईल. मराठा समाजाच्या संयमाचा अंत बघू नये अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी बारामती बंदचा इशारा देखील देण्यात आला आहे.
    आंदोलनाचा फटका; दिवसभरात लांब पल्याची एकही बस धावली नाही, अनेक बसेस रद्द, प्रवाशांचे झाले हाल
    अखिल मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी माने, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण,शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे , हेमंत नवसारे,संदीप मोहिते,रोहन शेरकर,सागर खलाटे,अर्चना सातव,शिवानी काटे यांनी सरकारचा निषेध करत सोमवारी बारामती बंद ठेऊन मूक मोर्चा काढणार असल्याचे यावेळी सांगितले.
    Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: पाणीकपातीचे संकट टळले, पालकमंत्र्यांनी काय माहिती दिली?
    यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने मराठा समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत हिंदू राष्ट्र सेना बारामती यांच्यावतीने देखील निवेदन देऊन निषेध करत मराठा समाजाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला,पुरुष,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.
    NCP : जुन्नरसाठी दोन्ही पवारांनी लावली फिल्डिंग, एकाच आमदारासाठी दोघांचा दौरा, अतुल बेनकेंच्या निर्णयानं..

    मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, महाविकास आघाडीनं टरबूज फेकून व्यक्त केला निषेध

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed