• Mon. Sep 7th, 2026
पत्नीचा जीव घेत पतीनेही आयुष्य संपवलं, ठाण्यात NCP च्या बड्या नेत्याच्या भावाचं टोकाचं पाऊल

ठाणे : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे शहराजवळील कळवा भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या हत्येनंतर पतीच्या मृत्यूचा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवासमध्ये राहणाऱ्या दिलीप साळवी यांनी आपली पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केली. दिलीप साळवी हे माजी उपमहापौर गणेश साळवी यांचे बंधू, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मिलिंद साळवी यांचे मावसभाऊ, तर माजी नगरसेविका अपर्णा साळवी यांचे दीर होते.

दिलीप साळवी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. साळवी यांनी आपल्या पत्नीवर गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकले नसून कळवा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सदर घटनेचा तपास सुरू केला आहे. दोघांचेही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

तू लई मोठा रील स्टार, हवाच काढतो तुझी; पुण्यात १८ तोळे सोन्याच्या चेनवरुन Insta स्टारला गंडा
पोलीस उपायुक्त गणेश गावडे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेचे नेमके कारण काय हे चौकशी आणि तपासा नंतरच स्पष्ट होणार असून सध्या पोस्टमोर्टमचा अहवाल आल्यानंतर तपासाला पुढील दिशा मिळेल, असे पोलीस उपायुक्त गावडे यांनी सांगितलं.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed