• Sat. Sep 21st, 2024
आई गेल्यावरही बाबा खंबीर होते, पण… सुधीर मोरेंनी आयुष्य संपवलं, निकटवर्तीय महिलेवर गुन्हा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. गुरुवारी रात्री मुंबईतील विक्रोळी-घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. त्यांच्या मुलाच्या जबाबाच्या आधारे कुर्ला रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी मोरेंच्या निकटवर्तीय महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

६२ वर्षीय सुधीर मोरेंचा मुलगा समर मोरे यांनी पोलिसांना सांगितले की आईच्या निधनानंतरही वडील मानसिकदृष्ट्या खंबीर होते, परंतु एका वकील महिलेने त्यांना सातत्याने मारहाण करत टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं. ती राज्य सरकारने स्थापन केलेल्या वैधानिक समितीशी संबंधित असल्याची माहिती आहे.

शुक्रवारी विक्रोळी पार्कसाइटमधील दुकानं बंद ठेवण्यात आली होती. पाचशेहून अधिक नागरिक सुधीर मोरे यांच्या अंतिम दर्शनासाठी जमले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, आदेश बांदेकर, भाजपचे प्रवीण छेडा यांनीही हजेरी लावली. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख होते.

तू लई मोठा रील स्टार, हवाच काढतो तुझी; पुण्यात १८ तोळे सोन्याच्या चेनवरुन Insta स्टारला गंडा
मोरे हे विक्रोळी पार्कसाईट येथे एकत्र कुटुंबात राहत होते. इंटिरिअर डिझायनर असलेल्या समर सुधीर मोरेला एक बहीण आहे. सुधीर मोरे यांच्या मेहुणी स्नेहल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ते गुरुवारी रात्री मीटिंगहून घरी परत आले. ते रात्री जेवले. सगळे जण आपापल्या खोलीत झोपायला गेले. सुधीर भाऊजी कधी निघून गेले, याची आम्हाला कल्पनाही नाही.

घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले
सुधीर मोरे यांनी घाटकोपर स्थानकात रिक्षा पकडली. स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये ते पश्चिमेकडून प्रवेश करत ब्रिजवरुन फलाट क्रमांक २ वर जाताना दिसले. ते प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकापर्यंत चालत गेले आणि रुळांवर उतरले. सीएसएमटीकडे जाणारी धीमी लोकल रात्री ११ वाजून दोन मिनिटांनी येताना आणि प्लॅटफॉर्मपासून सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर ब्रेक मारताना प्लॅटफॉर्मवरील कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप
सुधीर मोरे यांचा मृतदेह कमरेखालून चिरडलेला होता. त्यांच्याकडे दोन मोबाईल सापडले. त्यांची ओळख पटवण्यासाठी मोबाईलची तपासणी करण्यात आली. फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये मोरे फोनवर बोलताना दिसत आहेत. शेवटचा कॉलर कोण होता हे शोधण्यासाठी पोलिस त्यांच्या कॉल डेटा रेकॉर्डची तपासणी करत आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा संबंधित महिलेविरुद्ध कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मोरेंची तिच्याशी सात ते आठ वर्षांपासून ओळख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

समरने पोलिसांना सांगितले की, जून २०२३ मध्ये वडिलांना पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा मी तिच्याबद्दल पहिल्यांदा ऐकले. ती वडिलांच्या मोबाईलवर कॉल करत होती, तेव्हा समर तिच्याशी बोलला होता.

सुधीर मोरे यांनी अनेक दशकं या परिसरात काम केल्याची आठवण विक्रोळी पार्कसाईट येथील स्थानिक नागरिकांनी सांगितली. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुधीर मोरे हे पक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते होते, त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाल्याचे विनायक राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed