पंकजा मुंडे दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि देवींच्या साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी त्या निघणार आहेत.पंकजा मुंडे या दर्शन यात्रे संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमँध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.
आपण दोन महिने विश्रांती घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले होते, त्यानंतर काल (सोमवारी) पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती पोस्ट केला. यामध्ये आपण महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाचे तसेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार असल्याचं जाहीर केले होते. राजकीय भेटीगाठी यामध्ये होणार नसल्या तरी आपण देवदर्शनासाठी शिव आणि शक्तीच्या जागरासाठी महाराष्ट्रभरात फिरणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यात स्पष्ट सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे लोकांमध्ये येणारे स्पष्ट होतंय तर या यात्रेमध्ये आपल्या सोबत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंजका मुंडे या दौऱ्यात ५ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या दौऱ्याची सुरूवात घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर त्या नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शन घेतील.