• Mon. Nov 25th, 2024
    आई वडील कामाला गेले; चिमुरडा घरी एकटाच, खेळता खेळता पडला बाहेर, अन् पुढे घडलं त्यानं गाव हळहळलं

    नागपूर: रविवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्याचा सोनेगाव तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. साहिल रामप्रसाद राऊत (रा. गजाननधाम झोपडपट्टी, सहकारनगर) असे मृत मुलाचे नाव आहे.
    कृषी सेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण; नियुक्तीपत्र आलं, मात्र गंभीर आजारानं ग्रासलं, अन् सगळं संपलं
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलचे वडील रामप्रसाद हे श्रमिक आहेत. त्याची आई आणि मोठी बहीण घरकाम करतात. रविवारी सकाळी तिघेही कामावर गेले. साहिल हा घरी होता. खेळता खेळता तो घराबाहेर गेला. दुपारी त्याची आई घरी आली असता साहिल घरी नव्हता. त्याच्या आईने शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. सायंकाळी रामप्रसाद यांनी सोनेगाव पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून साहिलचा शोध सुरू केला. दरम्यान, नातेवाइकांनी साहिल हा बेपत्ता असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवरही छायाचित्रासह व्हायरल केली.

    कुमकर कुटुंबियांची लाडकी राणी गेली, टाळ-मृदुंगाच्या गजरात निरोप; अंत्ययात्रा पाहून सर्वच गहिवरले

    सोमवारी दुपारी एका नागरिकाला सोनेगाव तलावात मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. त्याने सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केला असता साहिलच्या शरीरावर कोणत्याही जखमेची खूण आढळून आली नाही. आंघोळीसाठी तो तलावात उतरला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed