• Sat. Sep 21st, 2024
चंद्रावर चमत्कारिक वातावरण, एकाच ठिकाणी ऊन अन् थंडी, ‘चास्ते’ उपकरणाची किमया; वाचा सविस्तर…

पुणे : ‘चांद्रयान ३’ मोहिमेतील विक्रम लँडरवरील ‘चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सप्रिमेंट’ (चास्ते) या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील मातीचे तापमान प्रथमच नोंदवले आहे. ‘चास्ते’च्या नोंदींनुसार चंद्राच्या मातीच्या फक्त आठ सेंटीमीटरच्या थरामधील तापमानात ६० अंशांपेक्षा जास्त तफावत आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून एक सेंटीमीटर उंचीवर तापमान ५६ अंश सेल्सिअस असताना चंद्राच्या मातीत आठ सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे १० अंश सेल्सिअस आहे.

‘चास्ते’ हे विक्रम लँडरवरील तीन उपकरणांपैकी एक असून, त्याची निर्मिती तिरुअनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (एसपीएल) आणि अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीने (पीआरएल) केली आहे. चंद्राच्या मातीचे औष्मिक गुणधर्म तपासणे हे या उपकरणाचे काम आहे. चंद्राच्या मातीत उभ्या स्थितीत हे उपकरण १० सेंटीमीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर उपकरणावर बसवलेल्या १० तापमापक सेन्सरच्या साह्याने मातीतील विविध स्तरांवर किती तापमान आहे हे समजू शकते.

चंद्रावरील नावांचं PM मोदींनी बारसं तर केलं पण एक अडचण, ‘आयएयू’ची मान्यता आवश्यक
‘चास्ते’ उपकरणाला जेव्हा प्रथमच सक्रिय करण्यात आले, तेव्हाच्या नोंदी ‘इस्रो’ने रविवारी आलेखाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या. या आलेखानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जिथे विक्रम लँडर उतरले आहे, तिथे जमिनीपासून साधारण एक सेंटीमीटर उंचीवर ५६ अंश सेल्सिअस तापमान आहे. तेथील मातीच्या पृष्ठभागाचे तापमान ५० अंश सेल्सिअस असून, पृष्ठभागापासून खाली सात सेंटीमीटर खोलीवर तापमान शून्य अंश सेल्सिअस होते. चंद्राच्या मातीत पृष्ठभागापासून आठ सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे १० अंश सेल्सिअस असल्याची नोंद ‘चास्ते’ने केली आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नोंदी प्रथमच

पृथ्वीवरील तापमानाशी याची तुलना केल्यास, उन्हाळ्यात वाळवंटी प्रदेशात नोंदले जाणारे सर्वाधिक तापमान आणि हिवाळ्यात हिमालयात नोंदले जाणारे सर्वांत कमी तापमान हे चंद्रावर एकाच ठिकाणी फक्त आठ सेंटीमीटरच्या मातीच्या थरात आढळून येते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ कोणत्याही उपकरणाने प्रत्यक्ष घेतलेल्या तापमानाच्या या पहिल्या नोंदी आहेत. पुढील आणखी दहा दिवस चंद्राच्या मातीतील तापमानात होणारे चढ-उतार ‘चास्ते’ नोंदवणार असून, या नोंदींमधून चंद्राच्या मातीच्या पाणी धारण करून ठेवण्याच्या क्षमतेविषयीही माहिती मिळण्याची ‘इस्रो’ला अपेक्षा आहे.

चंद्राचा पृष्ठभाग : ५६ अंश

८ सेंटीमीटर (अंतर)

तापमान : उणे १० अंश

गोल्डन बॉय नीरज चोप्राचा ‘सुवर्ण थ्रो’; पाकिस्तानी खेळाडूला नमवले अन् बनला वर्ल्ड चॅम्पियन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed