• Sat. Sep 21st, 2024
गुड न्यूज! मुंबई मेट्रोच्या कामाला गती मिळणार; ५४ कोटी रुपये खर्च करणार, MMRDA नं घेतला निर्णय

मुंबई: कल्याण (कृषी उत्पन्न बाजार समिती) ते ठाणे (कापूरबावडी) या मेट्रो ५ आणि दहिसर ते भाईंदर पश्चिम (सुभाषचंद्र बोस स्टेडियम) या मेट्रो ९ मार्गिकांचे रूळ बसवण्याची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. याअंतर्गत ६,८०० टनांचे रूळ खरेदी केले जाणार आहेत. यासंदर्भात एमएमआरडीएने काढलेल्या निविदेनुसार, दोन्ही मार्गिकांसाठी संयुक्तपणे रूळ खरेदी होणार आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ६,८०० टन रूळ पुरवणे अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेचे ७५ कोटी पाण्यात; बेकायदा बांधकामप्रकरणी दंडवसुलीत अपयश
रेल्वे खात्याने आखून दिलेल्या निकषांनुसार, हे रूळ विशिष्ट श्रेणीतील असणे अनिवार्य आहे. या रूळांची किंमत साधारण ५४.१८ कोटी रुपये असेल. मात्र त्यात जीएसटी, स्थानिक पातळीवरील वाहतूक व जीएसटी यांचा समावेश नसेल. १३ सप्टेंबरपर्यंत ही निविदा भरता येणार आहे. तसेच कंत्राट मिळाल्यापासून १२ महिन्यांच्या आत या रूळांचा पुरवठा करायचा आहे. एमएमआरडीएकडून मेट्रोसाठी खरेदी होणारे रूळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रेणीतील आहेत. या संबंधित श्रेणीतील १ मीटर लांबीच्या रुळांचे वजन ६० किलो असते. त्यानुसार ६,८०० टनांत ११४ किमी लांबीचे रूळ तयार होऊ शकतात.

आपला नाद खुळा अन् विषय हार्ड, पहिल्याच वाक्यानं रोहित पवारांनी कोल्हापूरची सभा जिंकली

मेट्रो ५ मार्गिका जवळपास २५ किमी व मेट्रो ९ ही १२ किमीची मार्गिका आहे. दुहेरी मार्गिकेच्या दोन्ही बाजूच्या रुळांचा विचार केल्यास साधारण १४८ किमीच्या रुळांची गरज असेल. मात्र मेट्रो ५ पहिल्या टप्प्यात १५ किमी अंतरावर सेवा सुरू होणार आहे. मेट्रो ५ ही २४.९० किलोमीटरची मार्गिका कल्याण आण ठाण्याला भिवंडीमार्गे जोडणारी आहे. त्यावर एकूण १७ स्थानके असतील. यापैकी पहिला टप्पा सात स्थानकांचा व १५ किमीचा असेल. या पहिल्या टप्प्यासाठीचे बांधकाम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. मेट्रो ९ ही जवळपास १२ किलोमीटर लांबीची मार्गिका आहे. त्यावर १२ स्थानके असतील. ही मार्गिका सध्या कार्यान्वित असलेल्या गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ शी संलग्न होणार आहे. मेट्रो ९ मार्गिकेचे बांधकाम ६५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed