• Sat. Sep 21st, 2024
सना खान हत्याकांड प्रकरण; भाजपच्या बड्या नेत्यांचाही सहभाग, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

नागपूर: सना खान खून प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये भाजपचे अनेक बडे नेते सामील असल्याचे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला सर्व माहिती मिळाली आहे. या सर्वांची नावे नक्कीच समोर येतील, असेही ते म्हणाले. गुरुवारी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील तेंदुखेडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
सना खान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांनी काँग्रेस आमदाराला चौकशीला बोलावलं, कारण…
या विषयावर वड्डेटीवार यांनी उत्तर दिले, “माझ्या मते या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे. अशा वेळी आमच्या आमदारांना, नेत्यांना उघडपणे बोलावले जाते. हा केवळ आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा वेळी आपल्या आमदारांना, नेत्यांना उघडपणे बोलावले जाते. तसेच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना लपून छपून बोलावलं जाते. हा केवळ आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. नागपुरातील अनेक बड्या नेत्यांचीही या प्रकरणात नावे आहेत. ते कोणत्या पक्षाचा आहे, याचे नाव मी घेणार नाही. याचीही माहिती आमच्याकडे आहे. खुद्द भाजपचा एवढा मोठा नेता ब्रिजभूषण सिंह ज्याने कुस्तीपटूंच्या मुलींचे शोषण केले. तो उघड्या तोंडाने फिरतो छाती वर करून फिरत असतो. त्यावेळी भाजपने काहीही केले नाही, असे ते म्हणाले.

कोल्हापुरात पवारांची सभा ठरली, हसन मुश्रीफ भावनिक, डोळे पाणावले

सत्तेच्या जोरावर जो काही अन्याय होत असेल, तो आम्ही उघडकीस आणू, असे वड्डेटीवार म्हणाले. सना खान प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी करणारे पत्र लिहू. कारण ईडी, सीबीआय सर्व भाजपकडे आहेत मग निष्पक्ष तपास कसा होणार. भाजप केवळ सूडाचे राजकारण करत आहे. यामध्ये बड्या नेत्यांची नावे बाहेर येतील आणि देश बघेल, असे ते म्हणाले. या सगळ्याचा फटका भाजपला भोगावा लागणार आहे. असे राजकारण देशाने पाहिलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed