• Sat. Sep 21st, 2024
शरद पवारांच्या एंट्रीआधी साताऱ्यात राजकीय तणाव; भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष पेटला!

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी २५ रोजी माणच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. मात्र, या इमारतीसाठी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी निधी मंजूर करुन आणला असल्याचे सांगत आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क एक दिवस आधीच या नूतन नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन एका तृतीयपंथीयांच्या हस्ते केलं. यामुळे दहिवडी येथे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप यांमध्ये श्रेयवाद पेटला आहे.

दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उद्या २५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवारांच्या हस्ते होणार होते. परंतु या इमारतीसाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने निधी आणला गेल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

कांद्यानंतर केंद्र सरकार कशाबद्दल वेगळा निर्णय घेणार, शरद पवारांनी शेतकऱ्यांना सतर्क केलं, म्हणाले…

काय आहे भाजपचा दावा?

‘साधना सिद्धार्थ गुंडगे या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष असताना फेब्रुवारी २०१७ मध्ये ठराव होऊन दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारत उभारण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी तरतूद करून १ कोटीहून अधिक निधीला गुंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभेत मंजुरी देण्यात आली होती. त्या ठरावाला वैशाली कदम सूचक आणि नलिनी काशीद अनुमोदक होत्या. एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या सभेत आम्ही इमारतीचे बांधकाम कसे करावे, याबाबत आढावा घेतला होता. दि. ७ जून २०१९रोजी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरपंचायत इमारतीच्या बांधकामाला शुभारंभ करण्यात आला होता. या इमारतीसाठी ज्यांचे काडीमात्र योगदान नाही ते प्रभाकर देशमुख आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. ते उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आम्ही होऊ नये यासाठी आज तृतीयपंथीयांच्या हस्ते आम्ही नगरपंचायतीच्या नूतनीमारतीचे उद्घाटन करत आहोत,’ असे दहिवडीच्या माजी नगराध्यक्ष साधना गुंडगे यांनी निवेदनाद्वारे म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed