• Sat. Sep 21st, 2024

खून करून पळाला, ७ वर्ष पोलिसांना चकवा, फोटोही नाही; नाव बदलून राहिला, अखेर असा अडकला जाळ्यात!

खून करून पळाला, ७ वर्ष पोलिसांना चकवा, फोटोही नाही; नाव बदलून राहिला, अखेर असा अडकला जाळ्यात!

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पनवेल परिसरात सन २०१६मध्ये घडलेल्या हत्याप्रकरणात मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या राजू चिन्नणा सिंगसानी या आरोपीचा पनवेल शहर पोलिसांनी तेलंगणा येथील अतिशय दुर्गम भागात शोध घेऊन त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचे कोणतेही छायाचित्र किंवा त्याचा मोबाइल नंबर नसताना पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडून आणले आहे.

आरोपी राजू सिंगनानी व त्याच्या साथीदाराने सन २०१६मध्ये मो. युसुफ मास्टरअली शेख (४२) या व्यक्तीची हत्या केली होती. तसेच, शेख यांची ओळख पटू नये, यासाठी त्यांचा मृतदेह काळुंद्रे गावाजवळील रेल्वे ट्रकच्या बाजूच्या नाल्यात टाकून दिला होता. त्यावेळी पनवेल शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली होती. मात्र दुसरा आरोपी राजू सिंगसानी हा फरार झाला होता. पोलिस गेल्या सात वर्षांपासून त्याचा शोध घेत होते.

Chandrayaan 3 : सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडरकडून पहिला फोटो अन् मेसेज, चंद्राचा दक्षिण ध्रुव कसा दिसतो पाहा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व त्यांच्या पथकाने फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या शोधमोहिमेत आरोपी राजू सिंगनानी हा सात वर्षांपासून ओळख लपवून तेलंगणा राज्यात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, आरोपी राजू याचे कोणतेही छायाचित्र अथवा त्याचा मोबाइल नंबर नसल्याने या आरोपीला शोधणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत पोलिसांच्या पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन मर्कुक पोलिस ठाण्यातील पोलिसांशी समन्वय साधून त्यांच्या मदतीने आरोपीचा दोन दिवस शोध घेतला. यावेळी आरोपी हा एरावली गाव येथे दुर्गम भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेऊन पनवेलमध्ये आणले.

दरम्यान, न्यायालयाने या आरोपीची तळोजा कारागृहात रवानगी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed