२५ टक्के इंडिकेटर सदोष
रेल्वे स्थानकांतील इंडिकेटरबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढत असल्याने, मध्य रेल्वेने नऊ रेल्वे स्थानकांतील इंडिकेटरमधील लोकल येण्याची अपेक्षित वेळेच्या अचूकता तपासण्याचा निर्णय घेतला. कुर्ला, घाटकोपर, दादर, भायखळा, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाकुर्ली आणि दिवा या स्थानकांतील तपासणीत सरासरी २५ टक्के इंडिकेटर सदोष असून, ७५ टक्के इंडिकेटर लोकल येण्याची अपेक्षित वेळ अचूक दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्याचे तंत्रज्ञान टीएमएस
स्थानकांतील फलाटावर लोकल येण्याची वेळ दाखवण्यासाठी ट्रेन मॅनेजमेंट यंत्रणेचा (टीएसएम) वापर केला जातो. हे तंत्रज्ञान २००८ मधील आहे. यामुळे रेल्वेने आयपी आधारित यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ऑप्टिकल फायबरचा वापर
टीएसएम तंत्रज्ञानामध्ये एकत्रित माहिती गोळा करून ती इंडिकेटरवर पोहोचवण्यात येते. आयपी आधारित तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक इंडिकेटरला स्वतंत्र क्रमांक देण्यात येतो. इंडिकेटरला ऑप्टिकल फायबरने जोडणी देण्यात येते. यामुळे कोणत्याही तांत्रिक अडथळे निर्माण न होता अचूक माहिती इंडिकेटरवर प्रवाशांना पाहायला मिळणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रस्ताव तयार
मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांसाठी २००८ मध्ये टीएमस यंत्रणा लागू करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान २६ रेल्वे स्थानकांतील ९२ फलाटांवरील इंडिकेटरसध्या टीएसएस यंत्रणेवर सुरू आहेत. प्रवाशांना अचूक माहिती मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा आयपी आधारित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रेल्वे मुख्यालयाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणीसाठी साधारण वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्थानकांवर अचूक वेळ
स्थानक इंडिकेटर अचूकता (टक्के)
कुर्ला – ८०
घाटकोपर – ६५
दादर – ८०
भायखळा – ९०
कांजुरमार्ग – ८५
भांडुप – ६५
मुलुंड – ७५
ठाकुर्ली – ८५
दिवा – ७५