• Sun. Sep 22nd, 2024

जगात भारी बातमी, आता दररोज मुंबईला जाता येणार; कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण, जाणून घ्या कधीपासून?

जगात भारी बातमी, आता दररोज मुंबईला जाता येणार; कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण, जाणून घ्या कधीपासून?

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रोज मुंबई विमानसेवा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करत असलेल्या कोल्हापूरकरांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

१ ऑक्टोबर २०२३ पासून, स्टार एअर या नामांकित कंपनीकडून, कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.

रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान झेप घेईल. सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर उतरेल.

त्यामुळे दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबई – कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू होत असल्याने, निश्चितच कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed