मुंबई, दि. 15: भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.