• Mon. Nov 25th, 2024
    चिमुकला शेतकरी पुत्र! थकलेल्या पित्याला पाहून जीव व्याकूळ; फवारणी पंप स्वत:च्या पाठीवर घेतलं अन्…

    चंद्रपूर: काळ्या मातीला हिरवा शालू पांघरण्यासाठी शेतकरी घाम गाळत आहे. शेतीत बळीराजाचं अख्ख कुटुंब राबत असतं. आपला बाप थकला आहे, तरी ही ओझं वाहतोय, हे या चिमुकल्याला बघवलं नाही. वडिलांच्या पाठीवरील ओझं या चिमुकल्याने आपल्या पाठीवर घेतले आहे. अन तोऱ्यात शेताकडे निघाला. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा अभियानातून घराघरावर तिरंगा फडकवला जात आहे. देशाचे ओझं वाहणारे भावी खांदे या चिमुकल्याच्या खांद्यासारखेच मजबूत होत आहेत. हेच या चिमुकल्याने दाखवलं.
    ४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व; १८ हून अधिक पदके, खेळाडूवर आली चहा पोहे विकण्याची वेळरेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र शेती आहे. जगाचा पोशिंदा अशी शेतकऱ्याची ओळख आहे. मात्र सरकारचे शेतीकडे मोठ दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही अधून मधून केला जातो. उन्हा-तान्हात राबणाऱ्या बळीराजावर आयुष्य संपवण्याची वेळ का येते, याचा गांभीर्याने विचार सरकारला करायला हवा. मागील वर्षी जून महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. सलग सहा पुराच्या फटका जिल्ह्याला सोसावा लागला होता. सलग तीनदा बळीराजावर पेरणी करण्याची वेळ आली होती. या संकटाला तोंड देत बळीराजाने शेती फुलवली. मागच्या वर्षीच्या तुलनेतच यावर्षी पाऊस होईल हा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात शेतीची मशागत केली. मात्र पाऊस रुसला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवडा आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. बळीराजांना पेरणी उरकली. पेरणी झाली आणि पाऊस गायब झाला.

    ७० वर्षांचं वाण, कासरलच्या वांग्यांतून महिन्याकाठी ६० हजारांचं उत्पन्न

    जिल्ह्यात अनेकांची धान्य लावणी खोळंबली आहे. कापूस पिकालाही पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या कापसाची फवारणी सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्याने हक्क शेतकरी कुटुंब शेतात राबताना दिसत आहे. अगदी पहाटेपासून तर दिवस संपेपर्यंत शेतकरी शेतात राबवत असतात. रोज शेतात राबवून थकून येणाऱ्या बापाला बघून चिमुकल्या शेतकरी पुत्राचा जीव कासाविस झाला. आपल्या वडिलांच्या खांद्यावर असलेलं फवारणी पंप आपल्या पाठीवर घेऊन जात असलेला हा चिमुकला बोरगाव पोंभुर्णा मार्गावर दिसून आला. या मार्गाने जाणारे अविनाश वाळके या तरुणाने या मुलाच्या व्हिडिओ केला. हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *