‘राजू शेट्टी यांच्यासोबत आमचे बोलणे सुरू ‘
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आपला पक्ष बळकट करत असून आमच्यासोबत महाविकास आघाडी मधील कोणते मित्रपक्ष सोबत आहेत. कोण विरोधात आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा आम्ही घेत आहोत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदार संघात काय भावना आहेत हे मी पाहत आहोत असेही चव्हाण म्हणाले आहेत.
तसेच हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत देखील आमचे बोलणे सुरू असून ते भाजपसोबत जाणार नाहीत. त्यांनी नेहमी जातीवादी पक्षांना विरोध केला आहे. राजू शेट्टी यांच्या सोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे. मात्र बैठकीत काय चर्चा झाली हे त्यांनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवलं आहे. तसेच राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले असले तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूनं आहे. नागरिक निवडणुकीची वाट पाहत आहेत असे पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत.
बीआरएसला सर्व रसद भाजपच्या वतीने देण्यात येत आहे
तसेच येत्या निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवणार असून आम्ही महाविकास आघाडी मधील सर्व पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहोत. असे म्हणत के चंद्रशेखर राव यांची बीआरएस ही भाजपची बी टीम आहे. बीआरएसला सर्व रसद भाजपच्या वतीने देण्यात येत आहे. के चंद्रशेखर राव हे नाराज आणि बंडखोर तसेच गेल्या निवडणुकीत काही मतांनी पराभूत झालेल्यांना सोबत घेत आहेत. तेलंगणामध्ये देखील निवडणुका असून येथे देखील काँग्रेस भक्कमपणे उभारली आहे. तेलंगणा मध्ये काँग्रेस विरुद्ध बी आर एस असाच सामना रंगेल असेही चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.