• Sat. Sep 21st, 2024
गुंतवणूक करण्याचा बहाणा, महिलेनं ओढलं जाळ्यात, ५ जणांना ४७ लाखांचा गंडा, अखेर गुन्हा दाखल

यवतमाळ: केंद्रीय पर्यटन विभागाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर शहरातील पाच जणांना ४७ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच अवधूतवाडी पोलिसांनी मीरा प्रकाश फडणवीस (रा. बालाजी सोसायटी) आणि त्यांचा साथीदार अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (रा. वाराणसी उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. मुख्य म्हणजे या गुन्ह्यातील आरोपी अनिरुद्ध होशिंग याच्यावर २००२ मध्ये अशाच एका फसवणुकीच्या प्रकरणात अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले होते.
तिघांना लुटलं, कार चोरली, दरोड्याचा बेत आखला… पोलिसांना रात्री अडीच वाजता फोन अन् दरोडेखोरांचा खेळ संपला
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामध्ये निवड निर्देशक सल्लागार समितीचे सदस्य असल्याचे मीरा फडणवीस आणि अनिरुद्ध होशिंग यांनी सांगितले. मीरा यांनी शहरातील अनेक उच्चभ्रू आणि सुशिक्षित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना रेल्वेत विविध साहित्य पुरवठा करण्याचे काम असून योग्य गुंतवणूक केल्यास प्रत्येकाला पाच ते सहा लाख प्राप्त होतील असे सांगितले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी नागपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली. या बैठकीला विदर्भातील २५ ते ३० गुंतवणूकदार हजर होते. रेल्वेकडून निविदा निघाल्या असून सुरूवातीला ३१ लाख रुपये अमानत रक्कम भरावी लागेल. नंतर तुमच्या नावाने करार करण्यात येईल, असे सर्वाना सांगण्यात आले.

चिमुकल्यांच्या जीवाशी क्रूर खेळ; सापांचा धोका, तरी १२ महिने शाळेसाठी सडक्या थर्माकोलवरून प्रवास

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून येथील सचिन अनिल धकाते यांनी १९ लाख, नीलिमा संजय मंत्री यांनी १४ लाख, मंजूषा विजय पोटे यांनी ७ लाख, सरिता अशोक राठी यांनी ६ लाख आणि चेतन भिसे यांनी १ लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून करार करण्याबाबत काहीच लेखी आले नाही. त्यानतंर गुंतवणूकदारांनी मीरा फडणवीस यांच्याशी वारंवार संपर्क साधला तेव्हा त्यांनी करार झाला नाही तर तुमचे पैसे मिळतील, असे सांगितले. पण करार झाला नाही आणि पैसेही मिळाले नाही. शेवटी सचिन धकाते यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी मीरा फडणवीस आणि अनिरुद्ध होशिंग यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed