• Mon. Nov 11th, 2024
    ठाण्यात मृत रुग्णावर ५ तास आयसीयूमध्ये उपचार? आव्हाडांचा संताप, डॉक्टरांना शिवीगाळ

    कल्पेश गोरडे, ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला. रुग्णालयात डॉक्टर नसणे, रुग्णांकडे लक्ष न देणे, जेवण न देणे असे गंभीर आरोप करून नातेवाईकांनी रुग्णालय दणाणून सोडलं. रुग्णालयातील रुग्णांची होत असलेली गैरसोय नातेवाईकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. तोपर्यंत ही बातमी कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर गेली. रात्री उशिरा कळवा रुग्णालयात धाव घेत त्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं.

    रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाच जणांना आपले जीव गमवावे लागल्याचा आरोप करत आव्हाडांनी याबाबत डॉक्टरांना जाब विचारला. त्यावेळी आक्रमक झालेल्या आव्हाडांनी तेथील कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत ‘लाज नाही वाटत का XXX… ५ तास डेड बॉडी अशी ठेवतात का? बघू नको हं माझ्याकडे…. एक खानाखाली देईन’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला..

    पत्रकाराची बातमी झोंबली, आधी शिवीगाळ, आता समर्थकांकडून मारहाण, शिंदे गटाच्या आमदाराची दादागिरी
    मृत व्यक्तीवर ५ तास उपचार, जितेंद्र आव्हाड संतापले

    गेली अनेक दिवस झाले, ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयाबाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो. तळपायाची आग मस्तकात गेली.

    कलावती म्हणाल्या, मोदी सरकारने मला काहीच दिलं नाही, राहुल गांधींमुळे माझं आयुष्य बदललं, अमित शहा तोंडघशी!
    त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.

    मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना, दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले आहे.

    या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत. डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत… इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच. पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो.

    शरद पवारांचं पंतप्रधानपद कुणामुळे हुकलं? अजितदादांची मोदींना टाळी, त्यांचीच री ओढली!
    रूग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले

    कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. उलट रुग्णांनाच धारेवर धरत आलेले सर्व रुग्ण हे अत्यंत गंभीर अवस्थेत होते. आमच्यावर प्रचंड ताण आहे, जमेल तेवढी आम्ही सेवा केली, असं स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहेत.

    या हॉस्पिटलमध्ये मर्यादापेक्षा जास्त रुग्ण आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली असून तरीही आम्ही जेवढे शक्य असतील त्या रुग्णावर उपचार करतोच आहोत, असंही रुग्णालय अधिष्ठातांनी स्पष्ट केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed