• Sat. Sep 21st, 2024

गारेगार प्रवास हवा, पण तिकीट नको! दंडामुळे दररोज २१६ फुकट्या मुंबईकरांचा खिसा ‘गरम’

गारेगार प्रवास हवा, पण तिकीट नको! दंडामुळे दररोज २१६ फुकट्या मुंबईकरांचा खिसा ‘गरम’

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून गर्दी वाढत असताना प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा जोर वाढवला आहे. गेल्या चार महिन्यांत रोज किमान २१६ प्रवाशांवर बडगा उगारत दंड वसूल करण्यात आला आहे. फुकट्यांवर कारवाई करूनही एसी लोकलमध्ये प्रवासी गर्दी कायम आहे.

तिकीट आणि पासधारक प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना गर्दीमुक्त डब्यातून प्रवास करता, यावा यासाठी विनातिकीट प्रवाशांविरोधात विशेष तपासणी मोहीम पश्चिम रेल्वेतील तिकीट तपासणीसांकडून हाती घेण्यात आलेली आहे. वातानुकूलित लोकलला मागणी सातत्याने वाढती आहे. एसी लोकलमध्ये तिकीट-पासधारकांसह विना तिकीट प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत असल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येते. त्यानुसार जुलैमध्ये लोकलमधील विनातिकीट आणि अयोग्य तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १५.८२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एप्रिल ते जुलै दरम्यान २६ हजारांहून अधिक प्रवाशांकडून ८७.११ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल ते जुलै २०२२च्या तुलनेत हे प्रमाण १८० टक्के अधिक आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

साध्या लोकलमध्येही विनातिकीट

-पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलमधून विनातिकीट प्रवाशांकडून एकूण ६१.२६ कोटींचा दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५८ हजार प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या प्रवाशांकडून २.५६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गोठेमालकांना खावी लागणार जेलची हवा; नागपूर महापालिकेने घेतला कारवाईचा निर्णय, काय कारण?
छुप्या पद्धतीने मालवाहतूक

-छुप्या पद्धतीने मालवाहतूक करून रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या पावणे दोन लाख प्रवाशांकडून पावणे अकरा कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed