धुळे : उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पुनश्च हरिओम म्हणत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला आणि चाटूगिरीला कंटाळून पक्षश्रेष्ठींकडे आधीच आपला राजीनामा सोपविला आहे. सध्यातरी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे.
धुळ्यात आज पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार अनिल गोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत गटबाजीमुळे गोटे यांची घुसमट होत होती. यापूर्वीही अनिल गोटे यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमातून पक्षांतर्गत गटबाजीबाबत उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. आणि त्यामुळेच पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत असल्याचे म्हणत गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. याबाबत पक्षप्रमुख शरद पवार यांनाही याबाबतची कल्पना दिली असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या तरी आपण कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे म्हणत आपण आपल्या स्वतःच्या लोकसंग्राम या पक्षात असणार आहोत. तथा शिवसेना ठाकरे गटाकडून काही प्रस्ताव आल्यास विचार करू आणि आपण महाविकास आघाडी पक्षाचा घटक म्हणून भाजपविरोधात आपली भूमिका असल्याचे गोटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.