• Mon. Nov 25th, 2024
    नागपूर पोलीस आयुक्तांचा दणका, चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई, उपराजधानीत नेमकं काय घडलं?

    नागपूर : दोन वेगवगळ्या घटनांमध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. तर, दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत रात्री उशिरा ड्युटीवरून परतणाऱ्या वाहतूक विभागाच्या पोलीस हवालदाराला लकडगंज पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेल्या मद्यधुंद पोलीस हवालदाराने जबर मारहाण केली. ही बाब गांभीर्याने घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित केले आहे.

    पोलीस चौकीत जुगार खेळणारे तीन कर्मचारी निलंबित

    दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील लकडगंज गुन्हे शाखेच्या युनिट-3 मधील पोलीस चौकीत पोलिस जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता या व्हिडिओची सगळीकडे चर्चा झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित केले आहे.रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लकडगंज गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलीस चौकीच्या लकडपूलच्या भागात बांधलेल्या टीन शेडखाली तीन पोलीस कर्मचारी टेबलावर पत्ते खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर व्हिडिओ बनवण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले.

    आनंद, फिरोज आणि रवी अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्याच्याजवळील दुसऱ्या टेबलावर बसलेले दोन कर्मचारी आपापल्या मोबाईलमध्ये बघण्यात व्यस्त होते आणि हे संपूर्ण दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले.नंतर हा व्हिडिओ पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अधिकारी मुम्मक्का सुदर्शन यांना सापडला आणि आज जुगार खेळणाऱ्या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

    वाहतूक पोलीस हवालदाराला मद्यधुंद पोलीस हवालदाराची जबर मारहाण

    आणखी एका घटनेत शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत रात्री उशिरा ड्युटी करून परतणाऱ्या वाहतूक विभागाच्या पोलीस हवालदाराला लकडगंज पोलीस ठाण्याच्या मद्यधुंद पोलीस हवालदाराने जबर मारहाण केली. ही बाब गांभीर्याने घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित केले आहे. आदित्य श्रीकांत ठाकूर असे निलंबित झालेल्या हवालदाराचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्यात तो बीट मार्शल होता.
    मुंबई कोल्हापूर मार्गावर वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
    सक्करदरा ट्रॅफिक झोनमध्ये तैनात कॉन्स्टेबल हर्षद इंदल वासनिक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हर्षद वासनिक भांडे प्लॉट येथे नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान ते कर्तव्य आटोपून दुचाकीने घरी परतत होते. त्याचवेळी ठाकूरही मित्रांसोबत पार्टी करून परतत होते. ठाकूर यांनी त्यांचे वाहन मेहंदीबाग पुलाजवळ हर्षदकडे नेले. ‘तुम्ही कुठे राहता, तुमचे नाव काय आणि कोणत्या ट्रॅफिक झोनमध्ये काम करता’ असे विचारू लागले.हर्षदने स्वतःची ओळख पोलीस असल्याची करून ठाकूर यांना ओळख विचारली. यावर ठाकूर संतापले आणि म्हणाले, तुमच्या पीआयला माझे नाव विचारा.
    शेतकऱ्यांच्या कामाची बातमी, जमिनीच्या मोजणीसाठी आता वाट पाहावी लागणार नाही, कारण…
    ठाकूर येथेच थांबले नाहीत तर त्याने हर्षद वासनिकला जबरदस्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर त्यांनी हाणामारी सुरू केली. हर्षद वासनिकच्या डोक्यात वार करुन जखमी केलं. यानंतर जखमी वासनिकने नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शांतीनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले.हर्षदच्या तक्रारीवरून ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या या वागण्यावर वरिष्ठ अधिकारीही संतापले आहेत. सोमवारी डीसीपी झोन ३ गोरख भामरे यांनी ठाकूर यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
    अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सुप्रिया सुळे आक्रमक, ९ सरकारं पाडली म्हणत भाजपला घेरलं

    चिमुकल्या क्रिकेटपटूला कडेवर घेत गिरीश महाजन केलं तोंड भरून कौतुक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed