पुणे: स्मार्ट सिटी मानले जाणाऱ्या पुणे शहरात प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. स्कूल व्हॅन चिखलात खचल्याने शाळकरी मुलांना कसरत करत व्हॅनला धक्का मारून चिखलातून काढण्याची वेळ आली होती. हा प्रसंग एका स्थानिक नागरिकाने मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
यानंतर पुणे महानगरपालिका आणि प्रशासनाला नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. गुरुवारी दि.३ रोजी बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रोड सर्वे नं। ३१,२ ब अर्थश्री सोसायटीच्या मागील बाजूला असलेल्या मार्गावर ही घटना घडली होती. तसेच येथे असलेल्या रस्त्याच्या समस्येमुळे येथील नागरिक अनेक दिवसांपासून वैतागलेले आहेत. या रस्त्याचे अद्यापपर्यंत डांबरीकरण झालेले नसल्याने पावसात येथील नागरिकांना चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांनी यासंदर्भात प्रशासनाला अनेकदा तक्रारी देखील केल्या आहेत.

मात्र, त्यांच्या या तक्रारींची प्रशासनाकडून अद्यापपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून सातत्याने असे प्रसंग त्या मार्गावर घडत आहेत, असे स्थानिक नागरिक सांगत आहे. विद्येचा माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरांमध्ये, शिक्षण घेण्यासाठी अशाप्रकारे शाळकरी मुलांना कसरत करावी लागत असेल, तर खेड्य-पाड्यात शाळकरी मुलांची काय अवस्था असेल ? असा मोठा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. मात्र या नंतर देखील प्रशासन याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.