नवी मुंबई : शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुर्भे येथील गणपती मंदिराजवळ खदानीमध्ये पोहायला गेलेला असताना २२ वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खदानीच्या पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयत तरुण हिमांशू म्हात्रे हा माजी शिवसेना नेते आणि नवी मुंबईचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचा नातू होता. हिमांशूच्या अकस्मात मृत्यूने म्हात्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवी मुंबई अग्निशमन दलाचे जवान काल रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. अखेर आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांमार्फत शोध कार्य करण्यात आले. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर खदानीच्या पाण्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढून तुर्भे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.
हिमांशू म्हात्रे असं मृत तरुणाचं नाव आहे. तो नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील बोनकोडे गावातील रहिवासी आहे. शिवसेनेचे माजी नेते व माजी नवी मुंबई जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांचे ते नातू होते.