• Sun. Sep 22nd, 2024

पिंपरीत केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा, विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र नोटीसा अन् नजरकैद

पिंपरीत केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा, विरोधी पक्षातील नेत्यांना मात्र नोटीसा अन् नजरकैद

पिंपरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या होत्या. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना नोटिसा दिल्या होत्या. तर, भापकर यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांना सकाळी दहा वाजल्यापासून सांगवी पोलीस स्टेशन येथे काळे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे व प्रकाश घोडके यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

केंद्र सरकार बहुराज्यीय सहकारी संस्थांना (मल्टीस्टेट) त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी डिजिटलवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्राने विकसित केलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्था एकात्मिक पोर्टलचे उद्‌घाटन सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथे करण्यात आले. यावेळी पोलिसांनी खबरदारी म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या.

अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेनं राजकीय वातावरण तापलं, जयंत पाटील मीडियासमोर येत म्हणाले…
पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवणे, पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई आदेश असे सांगताना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, कोणत्याही प्रकारचे निवेदन देता येणार नाही, काळे झेंडे दाखविण्यास सक्त मनाई आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोटीसीचा भंग होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

छोट्या स्वरुपातील गुंतवणूकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले

छोट्या स्वरुपातील गुंतवणूकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.

महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार देशात पोहोचले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता अनेकांनी सहकार क्षेत्राला पुढे नेले. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात सहकार क्षेत्राने चांगली प्रगती केली आहे, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह-अजित पवार एकाच मंचावर, भर मंचावर शाहांकडून कौतुक, दादांनीही दोन्ही हाथ जोडले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed