नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. राहत्या घरात सलाइनद्वारे भुलीचा ओव्हरडोस घेत तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहित प्रकाश कुमावत उर्फ बेलदार (वय २७, रा.आशीर्वाद ग्लोरी, बळी महाराज मंदिराजवळ, साईकृपा नगर, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित कुमावत हा शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभागात काम करत होता. बुधवारी (दि.२) तो परतला तेव्हा घरी कुणी नव्हते. रोहित विवाहित असून, पत्नी माहेरी गेलेली होती. त्याला १३ महिन्यांचा मुलगा आहे. आई मालेगावला परिचारिका आहे. यावेळी घरात कोणीही नसताना त्याने घरीच हाताला सलाईन लावून घेत त्यातून इंजेक्शनद्वारे भुलीचा ओव्हरडोस घेतला.

गुरुवारी (दि.३) रोजी सकाळी त्याची हॉस्पिटलमध्ये ड्युटी होती. मात्र, तो ड्युटीवर आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो घरी बेशुद्धावस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात रोहितच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, रोहितच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असून सातपूर परिसरात एका १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना दुसरी पंचवटी परिसरात घडली.