• Sat. Sep 21st, 2024
एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, मागणी मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण

नागपूर : सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने कामगारांच्या आर्थिक प्रश्नावर ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि १३ सप्टेंबरपासून जिल्हास्तरावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.

नुकतीच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची कोअर कमिटीची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या बैठकीत कामगार करारातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेला ४२ टक्के महागाई भत्ता तात्काळ लागू करण्यात यावा, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, पगारवाढीतील फरक तत्काळ अदा करण्यात यावा, वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे घोषित पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांचे वेतन काढून घेण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी सरकारकडे केली.

नितीन देसाई मृत्यूप्रकरणी सत्यजीत तांबे यांचे गंभीर विधान, अधोरेखित केली धक्कादायक बाब
यासह कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर ४,८४९ कोटी रुपये शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करण्याबाबत. १० वर्षांसाठी ७ वा वेतन आयोग लागू करा, अपहार प्रवण वाहकांचे बदली धोरण रद्द करा, खासगी गाड्यांऐवजी नवीन खासगी बसेसचा पुरवठा वाढवा, लिपिक-टंकलेखक या पदावर पदोन्नतीसाठी २४० दिवसांची अट रद्द करा, सेवानिवृत्त यांना एक वर्षाचा मोफत पास पती /पत्नीसह द्या अशी मागणी केली. आणि सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये विद्यमान कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांना फॅमिली पास देण्यात यावा.यासह इतरही मागणी केली गेली.

सरकारने उघडली तिजोरी, प्रत्येक गावात पोहोचणार ब्रॉडबँड, अडीच लाख लोकांना मिळणार रोजगार
ते मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करू

या मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे तर १३ सप्टेंबरपासून राज्यस्तरावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हत्तेवार यांनी सांगितले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सुनील केदार यांना मोठा झटका, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती कोर्टाने उठवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed