म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया (आयएस) या दहशतवादी संघटनेला दहशतवादी पुरविण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण करणाऱ्या मॉड्यूलवर एनआयएकडून कडक कारवाई सुरू आहे. याअंतर्गत एनआयएने याआधी पुणे, ठाणे आदी भागात कारवाई करुन तबिश नासर सिद्दीकी, झुबिर नूर मोहम्मद शेख (अबु नुसैबा), अदनान सरकार, शर्जिल शेख व झुल्फिकार अली बारुदवाला यांना मागील आठवड्यात अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या सहाय्याने एनआयएने शनिवार, ५ ऑगस्टला भिवंडीत छापा टाकून आफिफ नाचन याला अटक केली.

एनआयएने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘नाचन हा केवळ आयईडी तयार करण्यासाठी प्रशिक्षण देत नव्हता तर अन्य आरोपींद्वारे दहशतवादासंबंधित कारवाईत सहभागी होता. त्यामध्ये बारुदवाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी व अब्दुल कादिर पठाण यांचा समावेश आहे. या चौघांच्या सहकार्याने नाचन हा दहशतवादी कृत्यात सहभागी होता.’
या प्रकरणात महत्त्वाच्या अटकसत्रापासूनच नाचन हा एनआयएच्या लक्ष्यावर होता. त्याच्या शोधासाठी बोरिवली व भिवंडीत विविध छापे टाकण्यात आले. त्यात विविध डिजिटल उपकरणे व दस्तावेज जप्त करण्यात आले. त्याआधारे नाचन तपासाची व्याप्ती वाढवत आकिफ नाचनला शनिवार, ५ ऑगस्टला अटक करण्यात आली. त्याची अटक या प्रकरणातील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.