• Tue. Nov 26th, 2024
    स्पीड पोस्टने पाठवली वस्तू; पोहोचला फाटलेला बॉक्स, डाक विभागाचा बेभरोसे कारभार समोर

    अहमदनगर: कोपरगाव शहरातील व्यापारी महिपाल सिंग पोथीवाल यांनी २० जुलै रोजी कोपरगाव पोस्ट ऑफिस येथून स्पीड पोस्टाने आपल्या मुलीसाठी हेडफोन कल्याण येथे पाठवले होते. यावेळी त्यांनी सदर वस्तूचे वजन करून कोपरगाव पोस्ट ऑफिसमधून पोस्टाची रक्कम भरून अधिकृत पावती घेतली. तीन ते चार दिवसांनी कल्याणला पार्सल पोहोचले. परंतु ते खोक्यामधे असलेले हेडफोन गायब झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या मुलीने आणि जावई जितेंद्र यांनी सदरचे पार्सल स्वीकारले नाही.
    कौतुकास्पद! पुणे मेट्रोची स्टेरिंग नारी शक्तीच्या हाती; नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी
    पॅक खोक्यामधून पार्सल गहाळ होत असल्याने पोस्टाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसानंतर सदरचे पार्सल कोपरगाव पोस्ट ऑफिसला परत आले. यावेळी बॉक्समध्ये हेडफोन नव्हते आणि बॉक्स फुटलेल्या अवस्थेत होता. यावेळी महिपाल सिंग यांनी कोपरगाव पोस्टमास्तर गवळी यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट दाखल केली आहे असे म्हटले आहे. परंतु वस्तू कधी परत मिळणार याबाबत त्यांनी सांगितले नाही. नागरिक विश्वासाने पोस्ट ऑफिसमधून आपल्या वस्तू पाठवीत असतात. परंतु अशा प्रकारे नागरिकांच्या वस्तू गायब होत असतील तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कसा? हा देखील मोठा प्रश्न आहे.

    पावसाळी अधिवेशन संपलं तरी सरकार जनतेला दिलासा देऊ शकलं नाही, दानवेंची टीका

    महिपाल सिंग यांनी पोस्टावर विश्वास ठेवून आपली वस्तू पाठवली. परंतु वस्तूही गहाळ झाली आणि मानसिक त्रास ही त्यांच्या वाट्याला आला. चूक पोस्टाची तरी ग्राहकालाच याचा त्रास होत असल्याने महिपाल सिंग यांनी पोस्टाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. आज माझे हेडफोन गेले इतरांचा काय काय जात असेल अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. संबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची गरज आहे. कारण आज महिपाल सिंग यांचे हेडफोन गहाळ झाले. उद्या एखाद्याची मौल्यवान वस्तू गहाळ व्हायला नको. याची काळजी पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed