• Tue. Nov 26th, 2024
    लष्कराकडून फरार घोषित; मेजरने पुन्हा काढला पळ, नागपुरात उडाली खळबळ

    नागपूर: लष्कराने फरार घोषित केलेल्या मेजरला अटक केल्यानंतर दोन दिवसातच मेजर हे पुन्हा लष्कराच्या ताब्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. कामठी येथील गाय रेजिमेंटल सेंटरमधून तो फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या संदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या वतीने जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेजर राजीव ढालसिंग बोपचे (३५) असे फरार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
    स्पीड पोस्टने पाठवली वस्तू; पोहोचला फाटलेला बॉक्स, डाक विभागाचा बेभरोसे कारभार समोर
    बोपचे हे पंजाबमधील भटिंडा येथे तैनात होते. मात्र, फेब्रुवारी २०२० मध्ये लष्कराने त्याला फरार घोषित केले. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. या सूचनेनुसार त्याला इमिग्रेशन विभागाने २९ जुलै २०२३ रोजी नागपूर विमानतळावर ताब्यात घेऊन सोनेगाव पोलिस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गार्ड्स रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्याच दिवशी संध्याकाळी तेथील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये ठेवण्यात आले होते.

    नितीन देसाईंच्या अंत्यदर्शनाला पोहोचले आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर

    बोपचेची आई आणि भाऊ संदेश त्याला ३० जुलै रोजी भेटण्यासाठी आले होते. संध्याकाळी परतल्यानंतर बोपचे हा त्याच्या खोलीत होता आणि बाहेर शिपाई पहारा देत होते. रात्री आठच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तेथील ग्रील तोडून तो पळून गेला. लष्करातून फरार झालेला एक मेजर पकडल्यानंतर पुन्हा फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बोपचे यांच्याविरुद्ध जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed