• Fri. Mar 13th, 2026

    पुण्यात क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार; अट्टल गुन्हेगाराला पोलिसांचा दणका, कठोर पाऊल उचललं

    पुण्यात क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार; अट्टल गुन्हेगाराला पोलिसांचा दणका, कठोर पाऊल उचललं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते आणि त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या आदेशाने करण्यात आलेली ही ४२ वी कारवाई आहे.

    ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते (वय २३), वीर फकिरा युवराज कांबळे (वय २२, दोघेही रा. शिवणे, वारजे माळवाडी) यांच्यासह त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांवर कारवाई करण्यात आली आहे. सातपुते याला अटक करण्यात आली आहे. रामनगर येथील जय भवानी चौकात तक्रारदार तरुण मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तेव्हा आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी वारजे पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.

    नवं वळण! नितीन देसाई यांच्यामागे तगादा लावणारे ते अधिकारी कोण, आता होणार कसून चौकशी

    सातपुते आणि कांबळे यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली. सातपुतेने संघटित टोळी तयार करून खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी आणि पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गुन्हे वारंवार करीत असल्याने त्याच्यावर ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed