• Sun. Sep 22nd, 2024
विधानसभा प्रश्नोत्तरे

पिंपळदरी तलावाच्या दुरुस्तीसह सिंचनअनुशेषासाठी

निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३ : हिंगोली जिल्ह्यातील औंढा – नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी तलावाच्या सांडवा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध आहे. या तलावाच्या दुरुस्तीसह हिंगोली जिल्ह्याचा सिंचनअनुशेष पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य संतोष बांगर यांनी पिंपळदरी येथील सांडव्याची दुरुस्ती करणेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमाजी मालगुजारी तलावलघु पाटबंधारे तलावामधील गाळ काढण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच माजी मालगुजारी तलावाच्या संवर्धनाचा कार्यक्रम आखण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारसदस्य अशोक चव्हाण, नाना पटोलेप्रकाश आबिटकरतानाजी मुटकुळे यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

आरे वसाहतीतील मूलभूत सुविधाबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत

बैठक घेणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या वसाहतीतील मूलभूत सोयी सुविधाबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य रवींद्र वायकर यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान आरे वसाहतीतील रस्ते देखभाल, पथदिवेवैद्यकीय सुविधा याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीआरे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणाबाबत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील काही दिवसात आरेमध्ये तीनशेपेक्षा जास्त पथदिवे बसविण्यात आले आहेत. आरेमधील रहिवाशांना पाणीरस्तेआरोग्यवीज अशा मूलभूत सोयीसुविधा तत्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार – मंत्री दादाजी भुसे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान समृद्धी महामार्गावरील होणारे अपघात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. भुसे म्हणाले कीया महामार्गावर दररोज किमान १७ ते १८ हजार वाहने प्रवास करतात. भविष्यात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांना १२० किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता तसेच अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघात होऊ नये यादृष्टीने परिवहन विभागातर्फे वाहन चालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हेसूचना फलकेमाहिती फलकेवेगमर्यादा दर्शक फलके लावणेलेन मार्किंग करणे, उपाययोजना केलेल्या आहेतअसेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडेसुनील केदार यांनी सहभाग घेतला.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed