• Sat. Sep 21st, 2024

सायबरचोरांचा निवृत्त बँक मॅनेजरलाच गंडा, मिस कॉल दिला अन् खात्यातून ६ लाख गायब, काय घडलं?

सायबरचोरांचा निवृत्त बँक मॅनेजरलाच गंडा, मिस कॉल दिला अन् खात्यातून ६ लाख गायब, काय घडलं?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बँक ऑफ इंडियाच्या एका माजी शाखा व्यवस्थापकाच्या बँक खात्यावरच सायबरचोरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. खात्यामधील शिल्लक कळण्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल दिला. बॅलेन्स रकमेच्या माहितीचा संदेश येण्याऐवजी समोरून फोन आला. बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून समोरील व्यक्तीने व्यवस्थापकाच्या खात्यामधून सहा लाख रुपये परस्पर वळते केले.

वडाळा येथे वास्तव्यास असलेले विल्सन (बदललेले नाव) हे २०११मध्ये बँक ऑफ इंडियामधून सेवानिवृत्त झाले. त्यांनी स्वतःचे आणि पत्नीचे एका खासगी बँकेत खाते उघडले होते. या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे हे तपासण्यासाठी त्यांनी बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल दिला. मिस कॉल दिल्यानंतर शिल्लक रकमेचा तपशील संदेश स्वरूपात मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही म्हणून त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर संपर्क केला. यावेळी कुणीही प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने त्यांना समोरून फोन आला आणि फोन करणाऱ्याने बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. या प्रतिनिधीला विल्सन यांनी खाते क्रमांक सांगितला. परंतु हा खाते क्रमांक आमच्याकडे दिसत नसल्याचे कारण पुढे करून कथित प्रतिनिधीने त्यांना डेबिट कार्डबाबत विचारणा केली. यावर त्यांनी डेबिट कार्ड आहे असे उत्तर दिले.
उलटे सुलटे जबाब अन् उडवाउडवीची उत्तरे, गोळीबार केलेल्या चेतनने रेल्वे पोलिसांना काय काय सांगितलं?
बँकेच्या प्रतिनिधीने पाठविलेल्या लिंकवर जाऊन विल्सन यांनी डेबिट कार्डचा सर्व तपशील भरला. यानंतर त्यांना ओटीपी आला. बँक प्रतिनिधीने कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ओटीपी मागून घेतला. यानंतर थोड्या थोड्या वेळाने बँक खात्यामधून पैसे वजा होत असल्याचे संदेश येऊ लागले. विल्सन यांनी बँक प्रतिनिधीला संपर्क करण्याचा पर्यटन केला, मात्र प्रतिसाद काही मिळत नव्हता. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यामधून सहा लाख सहा हजार रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. विल्सन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर थकबाकीमुळे शाहरुख खानलाही दाखवला होता इंगा, महसूल दिनाच्या कार्यक्रमात सांगितला किस्सा

सोनं घ्यायला लोक दुकानात जाईनात, खरेदी टाळतायेत, नेमकं कारण काय?
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून त्याला आळा घालणं गरजेचं बनलं आहे.
Monsoon 2023 : राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक होणार, कोकणाला ऑरेंज अ‍ॅलर्ट, मुसळधार पाऊस कुठं पडणार, जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed