• Fri. Mar 13th, 2026

    महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली तंबी

    महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली तंबी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटला भेटल्याशिवाय कामे होत नाही असे आढळून आले आहे. मात्र, राज्याच्या सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारची एजंटगिरी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व विभागीय आय़ुक्त, जिल्हाधिकाऱ्यांह सर्व अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी दिली.

    महसूल दिनानिमित्ताने विधानभवनात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते. काही आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात एका अधिकाऱ्याच्या कार्यालयात मंत्र्याचे दूत ठाण मांडून बसले होते. त्यांच्याद्वारेच कामे होत असल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री पवार यांच्यापर्यंत करण्यात आल्या होत्या. त्याशिवाय अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांना सीबीआयने अटक केली. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणात होता. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

    मोदींच्या दौऱ्यानंतर अजित पवार ‘इन अॅक्शन’; पुण्यात दर आठवड्याला बैठक, प्रश्न निकाली काढणार!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed