• Mon. Sep 21st, 2026

गणेश मूर्तिकारांसह साठवणूकदारांना परवानगीची रक्कम आता एक हजार रुपयांऐवजी शंभर रुपये

ByMH LIVE NEWS

Aug 1, 2023
गणेश मूर्तिकारांसह साठवणूकदारांना परवानगीची रक्कम आता एक हजार रुपयांऐवजी शंभर रुपये

मुंबई, दि. १ : महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुंबई शहराचे पालकमंत्री  दीपक केसरकरअतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेआमदार ॲड.आशिष शेलार, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

            गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु.१०००/- असलेली  अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणेविसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणेशहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणेपीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले. चिनी बनावटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी सुद्धा पाऊले उचलली जातील. या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळेस महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई  केली जाईल.

            गणेशमूर्ती विसर्जनावेळी काही अडथळे येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed