ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडून प्राथमिक माहितीनुसार त्या खाली दबून १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून, सदर घटनेत अद्याप पर्यंत १४ व्यक्ती मृत असून, ०३ व्यक्ती जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दिनांक ०१/०८/२०२३ रोजी ०१:०७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहिीनुसार रात्री २३:०० ते ००:०० वाजताच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.

सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत. सदर घटनेत १४ व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ०३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. सदर माहिती ही प्राथमिक माहिती असून, सदर माहिती महसूल सहाय्यक, शहापूर यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.