मैदानावर फुलला क्रीडा प्रेमींचा मेळावा,
पारोळा (जिल्हा जळगांव), संपादक – अनुप फंड :- हरवलेल्या मैदानी खेळासाठी सरसावले पारोळा शहरातील क्रीडा प्रेमी – (पत्रकार राहुल निकम यांचा शहराच्या क्रीडा विषयावर चौफेर आढावा) *”मैदानी खेळ”*21 व्या शतकातील हरवत चाललेला शब्द. यापूर्वी अनेक लोक एकत्र येऊन खेळ खेळत होते परंतु आज प्रत्येकाच एक स्वतंत्र मैदान आहे ते म्हणजे “मोबाईल”. 6 इंच च्या डिस्प्ले हेच एक मैदान आजच्या पिढीचे क्रीडांगण झाले आहे. वयाच्या 4 ते 5 वयापासून पालक हे मैदान मुलांच्या हातात सोपवत असतात आणि याच 6 इंच च्या मैदानात मुलं आपली आयुष्य सोपवून टाकतात. दोष फक्त फक्त मुलांचा नाही अगदी पालक वर्ग देखील मैदान आणि मैदानी खेळाबाबत उदासीन झालेत. पालक सायंकाळी मैदानावर घेऊन जाणारी आमच्या आई वडिलांची शेवटची पिढी ठरेल की काय असे धोकादायक चित्र आज आहे। या चिंताजनक परिस्थितीवर खूप चर्चा मोबाईलच्या मैदानावर होत होत्या. परंतु यावर उपाय शोधला तो शहरातील क्रीडा प्रेमींनी, डॉ योगेंद्र पवार यांनी संकल्पना मांडली आणि शहरातील प्रसिद्ध क्रीडापटू प्रा. शैलेश पाटील, प्रा भावसार सर, श्री राजेश पाटीलसर, श्री पी जी पाटील,राकेश करोसिया, कोस्तुभ सोनवणे, सिद्धू जावळे, तोसिफ भाई, जॉन चोधरी, राजू बागडे, चेतन पवार… काही नाव लिहिली गेली नसतील….क्षमस्वहा उपक्रम वाऱ्यासारखा गावात पोहोचला आणि अनेक क्रीडाप्रेमीमध्ये एक उत्साह संचारला आणि हळूहळू एक मोठा गोतावळा तयार होण्यास मदत झाली. मदतीचा आणि सहकार्याचा सुरू झाला, शहरातील कराटे चे बीजे रोवली ते मिसर सर असतील, सायकलिंग प्रेमी श्री रोहन मोरे असतील, बॅडमिंटन चे श्री दिनेश गुजराथी असतील, प्रोत्साहन देऊन प्रत्यक्ष ग्राउंड वर सहभाग नोंदवणारे डॉ असोसिएशन अध्यक्ष महेश पवार तसेच सर्व तरुण डॉक्टर असतील, प्रसिद्ध CA मुकेशजी चोरडिया असतील त्याचबरोबरीने मोठे शिक्षण संस्थाचालक ज्यांच्या कडे आज मोठं मोठे मैदान उपलब्ध आहेत हजारो विध्यार्थी शिक्षण घेत आहे असे श्री करोडपती सर, श्री सुरेंद्रभाऊ बोहरा, श्री रोहन मोरे , श्री रोहन पवार यांनी मैदानी खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली त्यामुळे शहरातील क्रीडा प्रेमींना एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळायला मदत होईल.अगदी नाव न सांगता सर्वांची जेवणाची सोय करण्यासारखी मदत देखील देण्यात आली.अनेक मान्यवर , माजी खेळाडू, सक्रिय खेळाडू, क्रीडाप्रेमी एकत्र येऊन “फुटबॉल स्पर्धा” घेऊन शहरातील ठप्प पडलेली क्रीडा चळवळीला चालना मिळाली आणि शहरातील प्रसिद्ध NES हायस्कूल चे मैदानाला गतवैभव प्राप्त झालं. अगदी ग्रामीण भागातील तामसवाडी, बहदरपूर येथील टिम्स देखील स्पर्धेत सामील झाल्यात यात मुलींची टिम्स सुध्दा सामील होत्या या अभिमानाने संगण्यासारख्या गोष्टी आहेत.यातील दुसरी बाजू म्हणजे, अनेक समस्या ने त्रस्त असलेले गाव हे क्रीडा सुविधेतही मागास असच म्हटलं जातं। अगदी मूलभूत सुविधा ची दैना असलेले गावात क्रीडासुविधेत क्रांती होणे खूप लांबीचा पल्ला वाटतो. फुटबॉल सारख “लाथा घाला आणि उद्देश सफल” करा मैदानाबाहेर जास्त खेळताना आढळत. आज लहान विद्यार्थ्यांना खेळात रुची निर्माण व्हावी असे ठिकाण नाहीत. सुविधायुक्त मैदान नाहीत यामुळं कोचिंग, खाजगी कोचिंग किंवा प्रॅक्टिस करण्यास अडथळा निर्माण होतो. रस्ते पाणी वीज ज्या प्रकारे आवश्यक आहे त्याचप्रकारे मैदान देखील आवश्यक आहेत, हे आपले मूलभूत हक्क आहेत ह्याची जाणीवच शहरवासियांना नाही असे दिसून येते। प्रमुख दर्शनी भागावर शहरात दोन क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत पडून आहे, त्याकडे भविष्यात सैन्य भरती, शारीरिक सुदृढता, भविष्यात निर्माण होणारे खेळाडू डोळे लावून बसले आहेत. “भावी गोल्ड मेडलिस्ट” होण्या पेक्षा घरातील गोल्ड विकून भावी नेतेगिरी करण्यात तरुणाई अडकली. सकाळी मैदानावर घाम गाळत क्रिकेट खेळणाऱ्यपेक्षा लाखोंच्या मॅच लावून रात्र AC मध्ये जागुण पैसे कमवणारा उत्तम खेळाडू मानला जातोय. हे शहराच्या भविष्यासाठी धोकेदायक आहे. यावर जमल्यास विचार नक्की व्हावा.कालचा क्रीडाप्रेमी मिळून केलेला कार्यक्रम हा शहरातील खेळाडू साठी , नागरिकांसाठी नवसंजीवनी असाच म्हटलं जाईल। सक्रिय खेळाडू हे मैदान जिवंत ठेवत असतात. शहरातील क्रीडा प्रेमीचे मानलं तेव्हढ आभार कमी आहे, परंतु या कार्यक्रमाचे नित्यनियमाने आयोजन होणे गरजेचे आहे त्यासाठी शहरातील सर्वांनी एकत्र आणि आयोजकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. शेवटी एक सांगेन मी शेवटचं ग्राउंड वर खेळून किती दिवस झाले माहीत नाही, पण माझ्या गावात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कार्यात सहभागी व्हावे म्हणून डॉक्टर टिम्स कडून खेळलो, सोबत मुलगा राणा देखील होता. ग्राउंड माझ्या हातातील फुटबाल राणा ने मागितला पण मुलगा असला तरी फुटबॉल दिला नाही, त्याला सर्व पाहिले मैदान समजलं पाहिजे , मैदानाविषयी आदर निर्माण झाला पाहिजे स्वतःला कुठंतरी सिद्ध केलं पाहिजे तेव्हा गेम इन्स्ट्रुमेंट ला हाताळणे आवश्यक अस माझं वयक्तिक मत. फक्त वडिलांची ओळखीचे आहेत म्हणून पाहिजे ते करणं कुठंतरी रुतत होत. नंतर राणाला मैदानावरील प्लास्टिक बॉटल, केळीचे साल , पॅकेट्स जमा करून कचरा पेटीत टाकायला सांगितले त्याने ते केलेही त्यानंतरच एक मिनिट त्याच्याकडे फुटबॉल सोपवला. हे शिकलो आहे आमच्या क्रीडा शिक्षकांकडून त्यांच्या कृतीतून. त्याला कळत नसावं पण याच्यामागचा उद्देश भविष्यात कळावा हीच आशा. *काही विनंत्या सूचना*1. शहरातील प्रत्येक शाळेच्या मैदानावर कोणत्याही एक खेळाच स्वतंत्र सुविधा युक्त मैदान असावं … उदा. व्हॉलीबॉल, क्रिकेट पिच, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन. म्हणजे ज्याला ज्या खेळाची आवड आहे तो ते जॉईन करेल2. अनेक मुलींना , महिलांना खेळाची आवड आहे त्यांना स्वतंत्र मैदान उपलब्ध करून द्यावं3. शाळा , महाविद्यालयात रविवारी विद्यार्थी सोबतच शहरातील इतर क्रीडा प्रेमींना मैदान उपलब्ध करून द्यावं4. ग्राउंड वर फक्त खेळ व्हावा यासाठीं दक्षता घ्यावी, रात्री अंधारात मैदानात होणारी अनावश्यक घोळका, व्यसनाधीन टाळण्यासाठी लाईट ची व्यवस्था किंवा पोलीस प्रशासन यांनी याची गंभीर दखल घ्यावी.राहुल निकम9028190150