• Sat. Sep 21st, 2024

शेतकरी बिबट्याशी झुंजला आणि जिंकलाही! भररस्त्यातील थराराने सर्वच झाले अवाक्, नेमकं काय घडलं?

शेतकरी बिबट्याशी झुंजला आणि जिंकलाही! भररस्त्यातील थराराने सर्वच झाले अवाक्, नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : रात्रीच्या वेळी शेतातील वस्तीहून गावात दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून हल्ला केला. मात्र, शेतकऱ्याने दुचाकीची तुटलेली किकचा बिबट्याच्या डोक्यावर प्रहार करीत त्याला पिटाळून लावले. विष्णू बाळासाहेब तुपे (३०, रा. नायगाव, ता. सिन्नर) असे शेतकऱ्याचे नाव असून, ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत. नायगाव येथे गंगाघाट परिसरातील कातकाडे मळ्यात शनिवारी रात्री पावणेआठ वाजता ही घटना घडली.

शनिवारी नायगाव येथील बाजार असल्याने ते दुचाकीने रात्री शेतातील वस्तीहून गावात जात असताना कातकाडे मळा येथे उसात दडून बसलेल्या बिबट्याने तुपे यांच्यावर झडप घातली. यामुळे तुपे दुचाकीसह खाली पडले. यावेळी दुचाकी खाली पडल्याने जमिनीवर तुटून पडलेली दुचाकीची किक ऐनवेळी त्यांच्या हाती लागली. तोपर्यंत बिबट्याने तुपे यांना जमिनीवर लोळवले होते. परंतु, याही परिस्थितीत तुपे यांनी किकच्या सहाय्याने अंधारातच बिबट्याच्या डोक्यात, जबड्यावर एका मागोमाग एक प्रहार केले. या माऱ्यामुळे भांबावलेल्या बिबट्याने तुपे यांना सोडून उसाच्या पिकात धूम ठोकली. बिबट्या पळून जाताच तुपे जखमी अवस्थेत अर्धा किलोमीटर मागे घरी परतले. या घटनेची माहिती मिळताच जवळच वस्तीवर राहणारे दिगंबर कातकाडे यांनी तुपे यांना नायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तुपे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतदेह खाली पडले होते, तो पोलीस रिव्हॉल्व्हर घेऊन बोगीत फिरत होता; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

वन विभागाचा अजब सल्ला

बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच सिन्नर वन विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळीदेखील नायगाव येथे भेट दिली. बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असता वन विभागाच्या पथकाने वडगाव येथून पिंजरा आणण्यासाठी गाडीची व्यवस्था करा, असा सल्ला दिल्याचे कातकाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed