• Sat. Sep 21st, 2024
संततधार पावसामुळे फुले महागली, आवक घटल्याने किलोमागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ

ठाणे : गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्याने फुलांचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटले आहे. त्यात अधिक मासामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत असल्याने दरांतही वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. फुलांची टंचाई भासत असल्याने गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत झेंडू, निशिगंध, शेवंती, जरबेरा, गुलाब, आदी फुलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ठाणे शहरातील फुलबाजारात फुलांच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

फुलांची आवक घटल्याने ठाण्यातील जांभळी नाका, गोखले रोड, ठाणे स्टेशन तसेच इतर परिसरात असलेल्या फुल बाजारात गेल्या आठवड्यापासून फुलांची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे. १८ जुलैपासून श्रावण अधिक मास सुरू झाल्यानेही फुलांची मागणी वाढली आहे, पण पुणे, नाशिक आणि सोलापूरबरोबर गुजरातहूनही मुंबई आणि ठाणे परिसरात फुलांची आवक कमी झाली आहे. तर गेले दोन आठवडे पडत असलेल्या संततधार पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे कुजलेली फुले फेकण्याची वेळ फुलविक्रेत्यावर आली आहे.

Maharashtra Weather: राज्यात पावसाची असमान कृपा’वृष्टी’, एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे तूट
दरम्यान, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्तेही बंद असल्यामुळे ठाणे व मुंबईच्या बाजारात फुलांच्या गाड्या कमी येऊ लागल्या आहेत. परिणामी फुलांचे दर वाढतच आहेत. घाऊक बाजारात ४० रुपये प्रतिकिलोने विक्री करण्यात येणारा झेंडू सध्या ६० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे, तर ५० रुपये प्रति किलोने विकली जाणारी शेवंती सध्या ७० रुपये किलोने विक्री केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान होत असल्याने बाजारपेठेत फुलांची आवक कमी झाली आहे. परिणामी दिवसेंदिवस फुलांच्या दरात वाढ होत आहे.

संदीप यादव, फुलविक्रेते, ठाणे

किरकोळ बाजारातील फुलांचे दर (प्रतिकिलो)

फुले आठवड्याभरापूर्वी सध्या

झेंडू ६० ८० ते ९०

मोगरा ८० १०० ते १२०

शेवंती ८० १०० ते १२०

अष्टर ५० ७० ते ९०
राज्यातील प्रमुख ३२ धरणे ५५ टक्के भरली, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के तूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed