• Mon. Nov 25th, 2024

    ती सुखी संसाराची स्वप्न पाहत होती अन् त्याच्या डोक्यात भलतंच; भावी नवऱ्याचा कारनामा ऐकून हादराल

    ती सुखी संसाराची स्वप्न पाहत होती अन् त्याच्या डोक्यात भलतंच; भावी नवऱ्याचा कारनामा ऐकून हादराल

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावर नाव नोंदवल्यानंतर लग्नाच्या गाठी पडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका वधूच्या नशिबी फसवणूक आली. व्यवसायासाठी तब्बल साडेबारा लाख रुपये घेऊन या भावी पतीने पळ काढला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    काय घडलं?

    कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या आणि खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या प्रमिला (बदललेले नाव) हिने एका विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर वर शोधणे सुरू केले होते. नोकरी करून तिने लग्नासाठी आणि त्यानंतर संसारासाठी काही पैसे जमा करून ठेवले होते. काही दिवसांपूर्वी तिला इन्स्टाग्रामवर सूर्या पर्वथानेनी नावाच्या तरुणाची रिक्वेस्ट आली. नावाने तेलुगू वाटत असल्याने प्रमिला हिने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. सूर्या याने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरील प्रोफाइलचा दाखला देत प्रमिला हिच्यासोबत बोलणे सुरू केले.

    तेलुगू आणि इंग्रजी भाषेत चॅटिंग करू लागल्याने प्रमिलाने त्याला प्रतिसाद देत होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा पेट्रोलियमचा व्यवसाय सांभाळत असल्याचे सूर्या याने सांगितले होते. दररोज चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलवरून दोघे एकमेकांना भेटत होते. काही दिवसांतच त्याने प्रमिलाला लग्नाची मागणी घातली. आर्थिक परिस्थिती चांगली आणि मुलगा तेलुगू असल्याने प्रमिलाने त्याला होकार दिला.
    मुलांच्या करिअरची काळजी? पण अशी चूक करु नका; विले पार्लेत निवृत्त दाम्पत्यासोबत भयंकर प्रकार
    सूर्या याने तिला बंगळुरू येथून काही दिवसांनी भेटायला मुंबईत येतो, असे सांगितले होते. दरम्यान काही कारणास्तव त्याची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. ती सुरू होईपर्यंत व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याचे त्याने प्रमिलाला सांगितले. भावी पतीला नाही कसे म्हणायचे, म्हणून नोकरी करून जमावलेली सुमारे साडेबारा लाखांची रक्कम तिने सूर्य याने दिलेल्या बँक खात्यावर पाठवली. इतके पैसे घेतल्यानंतर सूर्या याचा संपर्कच होईना. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे प्रमिला हिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *