• Mon. Nov 25th, 2024

    Breaking News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा मोठी दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

    Breaking News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा मोठी दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

    म.टा.प्रतिनिधी, लोणावळा

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा दरड कोसळली, एक्सप्रेस वेवरील कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. दरड कोसळण्याची घटना गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पडली असून, दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी व देवदूत आपत्कालीन पथक आणि खंडाळा व वडगाव महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आयआरबी व देवदूत आपत्कालीन पथक युध्दपातळीवर मार्गावर पडलेली दरड हटविण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    गेल्या काही दिवासांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यात मुंबई आणि पुण्याचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात पावसाचा जोर आहे. या हंगामात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळण्याची ही पहिली घटना नाही. याआधी २४ जुलै रोजी खंडाळा घाटात आडोशी बोगद्यावजळ दरड कोसळली होती. तेव्हा वाहतूक विस्कळीत झाली होती आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही मार्गिका बंद ठेवण्यात आल्या होत्या.

    Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ
    पाचच दिवसांपूर्वी खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ तर चार दिवसांपूर्वी सुरू असलेल्या नवीन बोगद्याच्या जवळ डोंगरगावच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली होती. खंडाळा घाटमाथा परिसरासह मावळात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे डोंगर पठारावरील दरडी मातीचे ढिगारे सरकू लागले आहेत. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत पिंपळोली बोगद्याच्या तोंडाजवळ करुंज गावच्या हद्दीतील राऊतवाडी जवळ पुण्याहून मुंबईकडे जाताना बोगद्याच्या अगदी तोंडाजवळ येथील डोंगरावरील मोठी दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पाच दिवसांत सलग दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे एक्सप्रेस वेवरील दरडीचे संकट अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    राजापूर शहर अलर्ट मोडवर; पुराचे पाणी जवाहर चौकातून बाजारपेठेच्या दिशने, प्रशासनाकडून इशारा
    दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी व देवदूत आपत्कालीन पथक आणि खंडाळा व वडगाव महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आयआरबी व देवदूत आपत्कालीन पथक युध्दपातळीवर मार्गावर पडलेली दरड हटविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा मार्गावर पडलेली दरड जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. गुरुवारी दुपारी खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळील डोंगरावरील सैल दरडी हटविण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास थोपविण्यात आली होती. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनःस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रात्री पावणे नऊच्या सुमारास कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची नामुष्की ओढवली.

    अंधेरीतील चकाला येथे दरड कोसळल्याची दुर्घटना, दारं-खिडक्यांमधून मातीचा ढीग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed