• Sat. Sep 21st, 2024

क्लासवन अधिकाऱ्यानं लाच मागितली, डील पक्की झाली पण बेत फसला अखेर ACB कडून करेक्ट कार्यक्रम

क्लासवन अधिकाऱ्यानं लाच मागितली, डील पक्की झाली पण बेत फसला अखेर ACB कडून करेक्ट कार्यक्रम

अर्जुन राठोड, नांदेड : ६६ ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करण्याचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ६० हजार रुपये लाचेची मागणी करणारा स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयातील सहायक संचालक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईला पळ काढण्याच्या तयारीत असताना अधिकाऱ्यांनी घरी छापा टाकून एसीबीनं अटकेची कारवाई केली. संतोष कंदेवार असं क्लासवन अधिकाऱ्याचे नाव आहे.

संतोष कंदेवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परिक्षण कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आहेत. त्यांनी नांदेड जिल्हयातील ६६ ग्रामपंचायतीचे सन २०२१-२२ चे लेखापरिक्षण करून अहवाल सादर करण्याचे काम तक्रारदाराला दिले होते. काम दिल्याचा मोबदला म्हणून सह संचालक संतोष कंडेवार यांनी ग्राम पंचायतीच्या खर्चा नुसार ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागगाकडे १३ जुलै रोजी तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान यातील सह संचालक संतोष कंदेवार यांनी तक्रारदार यांना एकूण सत्तर हजार करून टाक असे म्हटलं. तडजोडीनंतर ६० हजार रुपये देण्याचं ठरलं. लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संतोष कंदेवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झुकरबर्गने खेळला आणखी एक गेम, Twitter चं खास फीचर आता थ्रेड्समध्ये

तीन ते चार दिवसांपासून पोलीस होते पाळतीवर

सहायक संचालक संतोष हणमंतराव कंदेवार याने लाचेची मागणी केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवसांपासून एसीबीचे पोलीस त्यांच्या पाळतीवर होते. तसेच सह संचालक कंदेवारलाही याचा संशय आला होता. म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री १० वाजताच्या राज्य राणी एक्सप्रेसने पलायन करण्याचा बेत आखला होता. रेल्वेचे आरक्षण काढले होते. परंतु, त्यापूर्वीच पाटबंधारे नगर (तरोडा बु.) येथील राहत्या घरातून एसीबीच्या पोलीसांनी सह संचालक संतोष कंदेवारला ताब्यात घेतले.
भाजपने तरी राज ठाकरेंना घेण्यासाठी दरवाजे कुठे उघडे ठेवलेत; आयुष्यभर आमच्यासोबत येऊ नका; मुनगंटीवारांचा पलटवार
एसीबीचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे, डीवायएसपी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन बोडके, पोलीस नाईक राजेश राठोड, ईश्वर जाधव, प्रकाश मामूलवार, मारोती सोनटक्के, गजानन राऊत, सय्यद खदीर यांनी ही कारवाई केली.

IND vs PAK: वनडे वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची तारीख बदलणार; अचानक झालं तरी काय

पैनगंगा नदीला पूर, विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed